Haryana Poultry Policy: हरियानातील पोल्ट्री उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने व्यवसाय सुलभता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. पोल्ट्री फार्मसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे सुलभीकरण, अन्य राज्यांतून खरेदी होणाऱ्या मका व बाजरीवरील मार्केट कमिटी शुल्क रद्द करणे, तसेच पोल्ट्री फार्मना ‘चेंज ऑफ लँड यूज’ (सीएलयू) अटीतून सवलत देण्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे..पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाचे (पीएफआय) अध्यक्ष रणपाल ढांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हरियानाचे शिक्षणमंत्री महिपाल ढांडा यांची भेट घेऊन उद्योगासमोरील विविध अडचणी मांडल्या..Desi Poultry Farming: अल्पभूधारक माळींना ठरला देशी कोंबडीपालनाचा आधार .त्यानंतर मुख्य सचिव अनुराग रस्तोगी, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अरुण कुमार गुप्ता, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष विनय कुमार आणि पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे संचालक डॉ. प्रेम सिंह यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली.Poultry Farming: लेयर कोंबड्यांच्या मरतुकीने अंड्यांचा तुटवडा; उष्णतेमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका.बैठकीत पोल्ट्री क्षेत्रातील प्रशासकीय अडथळे दूर करण्यासाठी विविध उपायांवर सहमती दर्शविण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे सुलभीकरण, अन्य राज्यांतून येणाऱ्या मका व बाजरीवरील मार्केट कमिटी शुल्क १० ते १५ दिवसांत रद्द करण्याची कार्यवाही, पोल्ट्री फार्मना सीएलयू अटीतून सूट देण्याचा विचार, तसेच क्रीडा विभाग आणि मध्यान्ह भोजन योजनेत अंड्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला..याशिवाय, पोल्ट्री क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असलेली पोल्ट्री डेव्हलपमेंट कमिटी स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. .हरियानात पोल्ट्री व्यवसायाचा मोठा विस्तार आहे. मात्र विविध कर आणि इतर कारणांमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. तो कमी करण्यासाठी सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.रणपाल ढांडा, अध्यक्ष, पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडिया.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.