Cotton Market Update : केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क काढून टाकण्याच्या निर्णयाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आधीच्या निर्णयानुसार १९ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या ४३ दिवसांसाठीच आयात शुल्क काढण्यात आले होते. परंतु गुरुवारी (ता. २८) अधिसूचना काढून शुल्कमुक्त आयातीची मुदत ३१ डिसेबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.