Gold Investment Tips: सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या मागणीत मोठा बदल झाला आहे. दागिन्यांच्या तुलनेत आता गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याकडे कल वाढत असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेच्या (डब्ल्यूजीसी) २०२६ च्या पहिल्या तिमाहीच्या अहवालात म्हटले आहे..या अहवालानुसार, ओव्हर-द-काउंटर (ओटीसी) व्यवहारांसह सोन्याची एकूण मागणी वार्षिक आधारावर दोन टक्क्यांनी वाढून १,२३१ टनांवर पोहोचली आहे. मात्र, किमतींमधील प्रचंड वाढीमुळे या मागणीचे मूल्य ७४ टक्क्यांनी वाढून १९३ अब्ज डॉलर या विक्रमी स्तरावर गेले आहे. सोन्याच्या वाढत्या किमती आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून किरकोळ गुंतवणूकदारांनी सोन्याची नाणी आणि विटांच्या (बार) खरेदीला पसंती दिली आहे..Gold Import Delay: अक्षय तृतीयेपूर्वी सुवर्ण बाजारावर झाकोळ.यामध्ये वार्षिक ४२ टक्के वाढ होऊन ही मागणी ४७४ टनांवर पोहोचली आहे. चीनमध्ये ही मागणी सर्वाधिक ६७ टक्क्यांनी वाढून २०७ टनांवर गेली आहे. भारत, दक्षिण कोरिया आणि जपानमध्येही खरेदीत वाढ झाली असून, ग्राहकांच्या मानसिकतेत हा संरचनात्मक बदल असल्याचे अहवालात नमूद केले आहे..Gold Price: सोन्याचा दर पुन्हा वधारला; प्रती तोळा १ लाख ५८ हजारांच्या पार.दुसरीकडे, सोन्याचे दर वाढल्याने दागिन्यांच्या मागणीत २३ टक्क्यांनी घट झाली असून ती ३०० टनांवर आली आहे. चीन, भारत आणि मध्य आशियाई देशांमध्ये हे चित्र प्रकर्षाने जाणवत आहे. अनेक ग्राहक आता दागिन्यांऐवजी गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्याकडे पाहत आहेत. जगभरातील मध्यवर्ती बँकांनी या तिमाहीत २४४ टन सोन्याची खरेदी करून साठ्यात भर घातली आहे. सोन्याचा एकूण पुरवठा देखील दोन टक्क्यांनी वाढून १,२३१ टनांवर पोहोचला असून, खाणींमधील उत्पादनाने पहिल्या तिमाहीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे..सोन्याच्या मागणीतील वार्षिक वाढदोन टक्केचालू वर्षीच्या पहिल्या तिमाहीतील मागणी१,२३१ टनसोन्याची नाणी,विटांच्या मागणीतील वार्षिक वाढ४२ टक्के (एकूण मागणी ४७४ टन)सोन्याची नाणी, विटांच्या मागणीतील वाढचीन ६७ टक्केयुरोप ५० टक्केअमेरिका १४ टक्केसोन्याच्या दागिन्यांच्या मागणीतील वार्षिक घट२३ टक्के (एकूण मागणी ३०० टन).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.