Gold Market 2025 : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ४००० डॉलर्स प्रति औंस पोहोचला आहे. म्हणजे ३,५०,००० रुपये. (एक औंस म्हणजे २८ ग्रॅमपेक्षा थोडे जास्त.) म्हणजे भारतात एक तोळा (१० ग्रॅम) सोन्याचा भाव १,२५,००० रुपयांवर गेला आहे.फक्त या वर्षाच्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सोन्याचा भाव ४७ टक्क्यांनी वाढला आहे. सोन्याचे भाव वाढण्यामागे सणासुदीचे दिवस, भारतीय लोकांमध्ये असणारे सोन्याचे वेड ही कारणे असल्याचे आपल्या मनात रुजवले गेले आहे. ही कारणे आहेतच. पण ती दुय्यम आहेत..त्यातील महत्त्वाची ढकलशक्ती आहे अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात देशोदेशींच्या केंद्रीय (सेन्ट्रल) बँकांनी चालविलेली धडाकेबाज खरेदी ! सामान्य नागरिकांनी केलेली सोने खरेदी आणि देशांच्या केंद्रीय बँकांनी केलेली सोने खरेदी यामागील कारणे पूर्णपणे भिन्न असतात. केंद्रीय बँका त्यांच्याकडील अतिरिक्त पैसे कोठे ना कोठे गुंतवतच असतात. त्यांच्याकडील ‘रिझर्व्ह मनी’चा काही भाग या बँकांनी सोन्यात नेहमीच गुंतवलेला असतो हे खरे. पण आज जे घडत आहे ते वेगळं आहे. खरेदीचे प्रमाण नॉर्मल की अपवादात्मक मोठे हा निकष लावला पाहिजे..Gold Silver Rate: सोने-चांदी दरात वाढीचा कल.ज्या वेळी या केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करू लागतात, त्या वेळी त्यांना भविष्यामध्ये जी अनिश्चितता दिसत असते. त्याला एक प्रकारचे विमा कव्हर म्हणून त्या बँका सोने साठवू लागतात. सोने हे ज्ञात काळापासून एक भरवशाचे रिझर्व्ह ॲसेट मानले गेले आहे. याआधी देखील १९३० मधील महामंदी, १९७० च्या सुरुवातीला तेल उत्पादक ओपेक देशांनी तेलाचे भाव एका रात्रीत काही पटीने वाढवून आणलेली अनिश्चितता, २००८ मधील सब प्राइम अरिष्ट अशा प्रत्येक वेळी केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली. या ऐतिहासिक घटनांच्या प्रकाशात सध्याची खरेदी बघावयास हवी. तरच त्यात लपलेले वेगळे अर्थ लागतील..Gold Price Rise: सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये जबरदस्त तेजी; नवीन उच्चांकाने गुंतवणूकदारांची धाकधुक वाढली.जगातील अनेक केंद्रीय बँका अमेरिकेसारख्या बलाढ्य अर्थव्यवस्थेच्या आणि अमेरिकेच्या स्थिर डॉलरमध्ये आपले रिझर्व्ह मनी गुंतवत असतात. त्यातून त्यांना व्याज आणि भांडवली नफ्यातून काहीतरी परतावा देखील मिळत असतो. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या राजवटीत आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भूराजनैतिक संबंधात तयार झालेली अनिश्चितता, अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल विश्वास डळमळीत होणे, अमेरिकन डॉलरचे वर्षभरात दहा टक्क्यांनी घसरणे, जपान- फ्रान्समधील राजकीय अनिश्चितता अशा अनेक कारणांमुळे या केंद्रीय बँका सोन्यामध्ये सुरक्षितता शोधत आहेत. यात आशिया, मध्यपूर्व आणि युरोपियन देशांमधील केंद्रीय बँका आघाडीवर आहेत.=.याचा अजून एक आयाम आहे. पूर्वी सोने खरेदीमध्ये सोन्यावर आधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (ETF) अस्तित्वात नव्हते. आता या फंडामध्ये विविध प्रकारचे गुंतवणूक फंड्स, अनेक हाय नेटवर्थ गुंतवणूकदार व्यक्ती मोठ्या प्रमाणावर भांडवल ओतत आहेत. त्याचा मोठा परिणाम भावावर झाला आहे.जगातील सर्व शेअर मार्केटचे निर्देशांक उच्चांकावर असताना, अशा अभद्र गोष्टी लिहिणाऱ्यांवर नाके मुरडली जातील हे मला माहीत आहे. परंतु भविष्याचा वेध घेताना, माहिती, आकडेवारी गोळा करून स्वतःची बुद्धी वापरणाऱ्यांसाठी या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.