Fruit Farmer Issues: पारंपरिक पिकांच्या तुलनेत फळशेती अधिक फायदेशीर ठरते, असा सर्वसाधारण समज असला तरी यंदा हा समज धुळीस मिळाल्याचे चित्र आहे. कलिंगड, खरबूज आणि केळी या प्रमुख फळपिकांना सध्या अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत..सध्या केळीला केवळ २५० ते ७२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, उच्च प्रतीच्या केळीचाही दर मर्यादितच राहिला आहे. दुसरीकडे, उन्हाळ्यात मोठी मागणी असणाऱ्या कलिंगडालाही अपेक्षित दर मिळत नसून प्रति क्विंटल २०० रुपयांपासून ६०० ते ७०० रुपयांदरम्यानच व्यवहार होत आहेत. खरबुजाची परिस्थिती आणखी बिकट असून ते प्रति क्विंटल एक हजार रुपयांपेक्षा कमी दरात विकले जात आहे..Kiwi Fruit Benefits: रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे किवी.यंदाच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने कलिंगड व खरबुजाच्या वेली वाळून गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा लागवड करावी लागली. त्यातून उत्पादन सुरू होताच बाजारभाव कोसळल्याने खर्चही निघणे कठीण झाले आहे. तसेच पश्चिम आशियात इराण आणि अमेरिका-इस्राईलमध्ये सुरू असलेली युद्धाची धुमश्चक्रीदेखील भावघसरणीला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.केळी उत्पादकांची परिस्थितीही चिंताजनक आहे. गेल्या काही दिवसांपासून केळीचे दर घसरत असून निर्यातीवरही परिणाम झाला आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे आखाती देशांकडे होणारी निर्यात मंदावल्याने त्यांना स्थानिक बाजारपेठेवरच अवलंबून राहावे लागत आहे. .Pune Fruit Market: उन्हाळी हंगामात फळे तेजीत.परिणामी, मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्याने दरांवर दबाव आला आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करत निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे. एकूणच, यंदा हंगामी फळपिकांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी आर्थिक संकटात ढकलल्याचे चित्र असून, या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे..या वर्षी १३५०० रोपे लावली आहेत. पुढील काळात लागवडीचे नियोजन आहे. एकरी लाख ते सव्वा लाख रुपये असा खर्च होत असतो. सध्या मिळणाऱ्या दरांमध्ये कुठल्याही उत्पादकाला केळीचे पीक परवडणारे नाही. केळीचे दर किमान १००० ते १५०० रुपयांदरम्यान मिळाले तरच दोन पैसे हातात पडू शकतात. अन्यथा, मेहनत वाया जाते.आशिष पाटील, केळी उत्पादक, वर्णा, ता. खामगाव, जि. बुलडाणा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.