Hormuz Strait Fertilizer Shipment: पश्चिम आशियातील तणावजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होर्मूझ सामुद्रधुनी यशस्वीरीत्या पार करून युरिया, डीएपी आणि सल्फर वाहून आणणारी चार मालवाहू जहाजे भारतातील बंदरांकडे रवाना झाली आहेत. ही जहाजे कृष्णपट्टणम, काकीनाडा, पारादीप आणि मुंद्रा बंदरांवर पोहोचणार असून, त्यातील खतसाठा खरीप हंगामातील मागणी पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय खते व रसायने विभागाने सोमवारी (ता. २३) दिली..या विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्चपासून देशांतर्गत खत उत्पादन १३३.१२ लाख टनांपर्यंत पोहोचले असून, या कालावधीत ४३.६९ लाख टन खतांची आयात करण्यात आली आहे. तसेच नुकत्याच बोलावलेल्या जागतिक निविदेत भारताने १७.७० लाख टन युरियाची खरेदी निश्चित केली असून, खरीप हंगामासाठी युरिया, तसेच स्फुरद आणि पालाश (पी अँड के) खतांचा एकूण ताब्यात असलेला पुरवठा ९० लाख टनांहून अधिक झाला आहे..Hormuz Strait Fertilizer Supply : युरियाची पहिली खेप भारताकडे रवाना; होर्मुज सामुद्रीधुनी खुली झाल्याने शेतकऱ्यांना खरिपासाठी खत उपलब्ध होणार.भारताने ओमान, मलेशिया, व्हिएतनाम, जॉर्जिया, नायजेरिया, रशिया, फिनलंड, इजिप्त, अल्जीरिया, तुर्कीये आणि नेदरलँड्स येथून युरिया मागविला आहे. तर डीएपी आणि एनपीके खतांचा पुरवठा रशिया, मोरोक्को, इजिप्त, अमेरिका, जॉर्डन, दक्षिण कोरिया, ट्युनिशिया आणि सौदी अरेबिया येथून लाल समुद्रमार्गे होत आहे. २२ जूनपर्यंत देशातील एकूण खतसाठा १९६.०८ लाख टनांवर पोहोचला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत तो १६८.६७ लाख टन होता..Hormuz Strait Fertilizer Trade: होर्मूझमधून युरियाची पहिली खेप रवाना.युरियाचा साठा ८१.४४ लाख टन, डीएपी २०.९२ लाख टन आणि एनपीके खतांचा साठा ५५.९१ लाख टनांवर पोहोचला आहे. म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) साठा १२.६८ लाख टन असून, सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) साठा २५.१३ लाख टन आहे..१ मार्चपासून आतापर्यंत देशात १५३.४० लाख टन खतांची विक्री झाली असून, गेल्या वर्षीच्या १४०.२० लाख टनांच्या तुलनेत ती अधिक आहे. यामध्ये ७९.१० लाख टन युरिया, ३४.८० लाख टन एनपीके आणि १९.८० लाख टन डीएपीचा समावेश आहे. राज्य सरकारे, वितरण यंत्रणा आणि सहकारी संस्थांच्या समन्वयातून खरीप हंगामात खतांचा पुरेसा व सुरळीत पुरवठा राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही या विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.