Nagpur News: कपास किसान ॲपच्या माध्यमातून राज्यात सुमारे पाच लाखांवर शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र अद्याप बाजारापर्यंत कापूसच आला नसल्याने खरेदीला प्रत्यक्षात सुरुवात झाली नसल्याची माहिती भारतीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष ललितकुमार गुप्ता यांनी दिली. महाराष्ट्रात खरेदीसाठी सीसीआयच्या जोडीला महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघदेखील राहणार असून तसा सामंजस्य करार करण्यात आला. .देशात यंदा ३०० ते ३१० लाख गाठी कापसाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारने कापसाला ८८१० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. परंतु प्रत्यक्षात कापसाचे व्यवहार खुल्या बाजारात ७००० ते ७५०० रुपयांनी होत आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात भारतीय कापूस महामंडळाच्या खरेदी केंद्रावर आवक वाढती राहील, असे संकेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सीसीआयने देखील १५० केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे..Cotton MSP Procurement: ओलाव्यात अडकली कापुस खरेदी; ओलावा जास्त असल्याने कमी भावात कापुस विकण्याची वेळ.संभाव्य आवकेचा अंदाज येण्यासाठी सीसीआयने यंदा कपास किसान पोर्टलवर नोंदणीची सक्ती केली. त्यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रात सुमारे पाच लाखांवर शेतकऱ्यांची नोंदणी प्रकिया पूर्णत्वास गेली आहे. बाजार समित्यांकडून या शेतकऱ्यांच्या माहितीचे प्रमाणीकरण पूर्णत्वास गेल्यानंतर त्यांना हमीभाव केंद्रावर कापूस आणण्यासाठी स्लॉट देण्यात येणार आहे. निर्धारित स्लॉटप्रमाणे आठवडाभराच्या कालावधीत कोणत्याही दिवशी आणि केंद्रावर कापसाची विक्री करता येईल..नव्वद कोटी रुपयांसाठी पाठपुरावायंदाच्या खरेदी प्रक्रियेत सीसीआयने केंद्रांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघासमवेत सामंजस्य करार केला आहे. परंतु दोन वर्षांपूर्वी पणन महासंघाने सीसीआयसमवेत कमिशनतत्त्वावर कापसाची खरेदी केली होती. यातील व्याज तफावतीची ९० कोटी रुपयांची रक्कम केंद्र सरकारकडे थकित आहे. गेल्या दोन वर्षांपासून यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री, पणनमंत्रीदेखील ही रक्कम मिळावी याकरिता प्रयत्नशील आहेत. हा तिढा सुटताच केंद्र सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे पणन महासंघाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले..Cotton Damage : सप्टेंबरमध्ये तीन जिल्ह्यांत कपाशीचे ६ लाख ४६ हजार हेक्टरवर नुकसान.दोन वर्षांपूर्वी पणन महासंघाने सीसीआयचा एजंट म्हणून कमिशन तत्त्वावर खरेदी केली होती. त्यानंतर यंदाच्या हंगामात खरेदीसाठी सीसीआय आणि पणन महासंघात सामंजस्य करार झाला आहे. १५० पैकी २० ते २२ केंद्रे पणन महासंघाची राहतील, अशी शक्यता आहे. तांत्रिक प्रक्रिया पार पडताच याबाबतचा निर्णय होईल.प्रसन्नजीत पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई.पाच लाखांवर शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. देशातील काही भागात सीसीआयकडे कापसाची आवक होत असली तरी अद्याप महाराष्ट्रात आवक नाही. कपास किसान ॲपमुळे नोंदणी प्रक्रिया झाल्याने नेमक्या आवकेची माहिती होईल.ललितकुमार गुप्ता, अध्यक्ष, भारतीय कापूस महामंडळ.कपास किसान ॲपवर नोंदणीची प्रक्रिया सुलभ आहे. मात्र एकाच व्यक्तीने पाच ते सहा वेळा नोंदणी केली. प्रत्येक वेळी एक दस्तऐवज संलग्न करण्यात आला. अशा व्यक्तींचा शोध घेत त्यांनी सर्व दस्तऐवजांसह नोंदणी केलेला एकच अर्ज कायम ठेवावा लागत आहे. यामध्ये बाजार समिती कर्मचाऱ्यांचा बराचवेळ खर्ची होत आहे. त्यात सुलभता येण्याची गरज आहे.समीर पेंडके, सचिव, बाजार समिती, वर्धा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.