Pune News: दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळखोरांवर झालेल्या कारवाया आणि सणासुदीमुळे मागणीत झालेली वाढ बघता दूध खरेदीचे दर यापुढे ही तेजीत राहू शकतील, असे डेअरी उद्योगाचे म्हणणे आहे..महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले, की दूध व पनीर भेसळीच्या विरोधात राज्याच्या विविध भागात झालेल्या कारवाया शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरल्या आहेत. कारण या कारवायांमुळे भेसळ नियंत्रणात आली व दर्जेदार दुधासाठी मागणी वाढली. सणासुदीला अस्सल व दर्जेदार पनीरचा खप वाढला. यामुळे खासगी व सहकारी दूध संघांना महिनाभरात गाईच्या दूधदरात प्रतिलिटर तीन रुपयांपर्यंत वाढ करता आली आहे..Cow Milk Price: गाईच्या दुधाचा खरेदी दर ३५ रुपयांवर.पशुखाद्यदरातील तेजी तसेच दूध उत्पादन खर्चात झालेली वाढ बघता शेतकऱ्यांना गायदुधासाठी अधिक दर मिळावेत. तसेच खरेदीदर प्रति लिटर ३५ रुपयांपेक्षा कमी दर मिळू नये, असा प्रयत्न डेअरी उद्योगाचा आहे. सणासुदीमुळे दुधाला मागणी असल्यामुळे दरपातळी टिकवून ठेवणे तूर्त शक्य आहे, असेही श्री. कुतवळ यांनी स्पष्ट केले..दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी (कात्रज) दूध संघानेही महिन्याभरात गाय दूध खरेदी दरात तीन वेळा वाढ केली आहे. त्यामुळे एक सप्टेंबरपासून ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ श्रेणीच्या दुधासाठी शेतकऱ्यांना ‘कात्रज’चा खरेदीदर प्रति लिटर ३५ रुपये; तर सहकारी दूध सोसायट्यांना वरकड खर्चासह ३५.८० रुपये दिला जात आहे..Gokul Milk Rate : ‘‘गोकुळ’तर्फे म्हैस, गाय दूध खरेदी दरात एक रुपया वाढ’.अमेरिकन दुग्धजन्य पदार्थ आयातीला भारताने दिलेला नकारदेखील दूध खरेदी दरवाढीला पोषक ठरला, असे फत्तेसिंगराव नाईक (अप्पा) सहकारी दूधसंघाचे महाव्यवस्थापक संजय भागवतकर सांगतात. ‘‘डेअरी क्षेत्रात भेसळ रोखता शेतकऱ्यांच्या गुणवत्तापूर्ण दुधाला भाव मिळतो. भेसळयुक्त तूप व पनीरचा शिरकाव मुख्यत्वे गुजरातमधून होत असल्याचा संशय आहे. त्याला पायबंद घालावा लागेल’’ असेही ते म्हणाले..भेसळीवर लक्ष ठेवण्यासाठी नवे निरीक्षकडेअरी उद्योगात चालू असलेली भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ४२ नवे अन्न निरीक्षक आता तैनात केले आहेत. भेसळीला काही खासगी डेअरी प्रकल्प चालक व सहकारी दूध संघदेखील प्रोत्साहन देतात. त्यासाठी एफडीए, जिल्हा प्रशासन, पोलिस, दुग्धव्यवसाय विभाग व महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाला समन्वय ठेवावा लागेल. या यंत्रणा एकत्र आल्या तरच भेसळखोरांना जरब बसेल, असे एका सहकारी दूध संघाच्या व्यवस्थापकाने स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.