Nashik News : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने ‘किंमत स्थिरीकरण निधी योजने’अंतर्गत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’या दोन नोडल एजन्सीमार्फत शेतकऱ्यांकडून ३ लाख टन कांद्याची खरेदी पूर्ण केली. खरेदीपश्चात ७२ तासांत पैसे देण्याचे सांगितले असताना दोन महिने उशिराने शेतकऱ्यांचे एकूण देयकांच्या ७५ टक्के पैसे अदा केले. मात्र अद्याप शेतकऱ्यांची २५ टक्के देयके रोखलेली आहेत. ही रक्कम जवळपास १०० कोटींवर असल्याचे समजते. अगोदरच अतिवृष्टीचे संकट, त्यात आता सणासुदीच्या तोंडावर आर्थिक कोंडी होत आहे..शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी झाल्यानंतर जवळपास दोन महिने शेतकऱ्यांना खात्यावर पैसे मिळाले नव्हते. ‘ॲग्रोवन’ने सातत्याने हा प्रकार समोर आणला. त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ग्राहक व्यवहार, अन्न व नागरी पुरवठामंत्री प्रकाश जोशी, विभागाच्या सचिव निधी खरे यांसह वरिष्ठांच्या भेटी घेतल्या. अखेर गणेशोत्सव काळात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर खरेदीच्या ७५ टक्के रकमा वर्ग झाल्या, तर २५ टक्के रक्कम बाकीच होती..Kharif Onion: मुहूर्तालाच खरीप कांद्याची आवक कमी, दरातही नरमाई.आता रब्बी हंगाम तोंडावर असताना मागील रब्बी हंगामात उत्पादित कांद्याचे पैसे मिळत नसल्याने कष्टाच्या पैशांसाठी शेतकऱ्यांना विनवण्या कराव्या लागत आहेत. एकीकडे अतिवृष्टीमुळे खरिपातील पीक हातातून गेले, दुसरीकडे दिवाळी तोंडावर आहे. पुढील एक दीड महिन्यात लग्नसराई, मुलांचे शिक्षण व कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चासाठीसुद्धा अनेकांकडे पैसे नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे..एकीकडे शेतकऱ्यांचा कांदा १४ ते १६ रुपये किलो दरम्यान खरेदी करून आता सरकार २० रुपये किलोवर तो बाजारात विकत आहे. प्रत्यक्षात कांदा विक्रीतून पैसे मिळवित आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कष्टाचा पैसा दिला जात नसल्याने केंद्राच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला जात आहे..Onion Prices: कर्नाटकात कांद्याचे भाव गडगडले, हमीभाव देण्याची मागणी.ग्राहक व्यवहार विभागाची मनमानीअगोदरच कांदा खरेदीसाठी खरेदीदारांची निवड अंतिम करताना गोंधळ समोर आले. त्यानंतर जुलै व ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी सुरू केली. अखेर दोन महिन्यांनी सप्टेंबरमध्ये हे पैसे शेतकऱ्यांना मिळाले. मात्र प्रत्यक्षात दाखवलेली खरेदी व उपलब्ध कांदा साठ्याचा ताळमेळ बसत नसल्याने पेमेंट अद्याप दिले जात नसल्याचे समजते. प्रत्यक्षात सप्लाय व्हॅलिड एजन्सीने ही खरेदी दाखवली..त्यानंतर आता ५ वेळेस केंद्राच्या पथकांनी पाहणी केली. त्यातच कांदा खरेदी करून आता तीन महिने झाल्याने वातावरणीय बदलांमुळे त्याचे वजनदेखील कमी होत आहे. शेतकऱ्यांची पैशांसाठी आडवणूक करू नये, त्यांचे पैसे तत्काळ अदा व्हावेत, अशी मागणी होत आहे. मात्र काही खरेदीदारांनी यात घातलेला गोंधळदेखील कारणीभूत आहे. याशिवाय खरेदीच्या तुलनेत प्रत्यक्ष कांद्याचा साठा उपलब्ध नसल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. मात्र शेतकरी आक्रमक झाले असून खरेदी करणाऱ्या संस्थांकडे पैशांसाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे खरेदीदार संस्थांचे संचालकदेखील तणावात आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.