Panaji News: भारताने इथेनॉल पुरवठा वर्ष २०२५ मध्ये जवळपास २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य केले. इथेनॉलमुळे भारताने १९.३ अब्ज डॉलर्सची परकीय चलनाची बचत केली आहे. तर यातून शेतकऱ्यांना मागील दशकभरात १५ अब्ज डॉलर्स मिळाले आहेत, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी सांगितले. ते गोव्यातील चौथ्या ‘इंडिया एनर्जी वीक- २०२६’ च्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. .पुरी म्हणाले, की जैवऊर्जेच्या क्षेत्रातील व्यापक प्रयत्नाचा भाग म्हणून भारत आपले कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे. जागतिक वीज निर्मितीत नवीकरणीय ऊर्जेचा वाटा एक पंचमांशवरून जवळपास एक तृतीयांश इतका वाढला आहे. तरीही वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी पारंपरिक ऊर्जेची गरज अजूनही कायम आहे..Ethanol Production: वर्षभरात सव्वाशे लाख टन मक्यापासून इथेनॉल निर्मिती.देशाच्या भविष्यातील ऊर्जेच्या मागणीवर बोलताना पुरी म्हणाले, ‘‘२०५० पर्यंत जगातील एकूण ऊर्जा मागणीत भारताचा वाटा जवळपास ३०-३५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे जगाच्या एकूण ऊर्जा मागणीत भारताचा वाटा सुमारे १० टक्के असेल.’’.Ethanol Blending: इथेनॉलमुळे १९.३ अब्ज डॉलर्स परकीय चलनाची बचत, शेतकऱ्यांचाही फायदा : पुरी.सध्या पेट्रोलियम क्षेत्राचा भारताच्या एकूण व्यापारात सुमारे २८ टक्के वाटा आहे. जहाजबांधणीसाठी सरकारने दिलेल्या ८ अब्ज डॉलर पॅकेजच्या पार्श्वभूमीवर, तेल आणि गॅस व्यापारासाठी गरजेच्या असलेल्या ६० जहाजांसाठी ५ अब्ज डॉलरची गुंतवणुकीची संधी नजीकच्या काळात असल्याचे पुरी यांनी यावेळी सांगितले. यादरम्यान, पुरी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि संयुक्त अरब अमिरातीचे उद्योग मंत्री सुलतान अल जाबेर यांची भेट घेतली..देशात इंधन दर कमी२०२१ नंतर जगातील अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये इंधनाच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली. पण २०२५ मध्ये भारतातील इंधन दर मात्र कमी पातळीवर राहिला. तसेच सुमारे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या १० कोटी लाभार्थ्यांसाठी एलपीजी सिलिंडरचा दर सुमारे प्रति सिलिंडर ५.५ ते ६ अमेरिकी डॉलर इतका स्थिर राहिला. हा दर जगातील सर्वांत कमी दर आहे, असा दावा पुरी यांनी केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.