Nagpur News: देशात सोयाबीन तेलाची आयात अधिक प्रमाणात केल्यामुळे खाद्यतेल स्वस्त झाले आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात तेलबियांच्या दरात सातत्याने घसरण नोंदवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या तुलनेत सोयाबीन तेलाचे दर कमी असल्याने खाद्यतेल आयातीत मोठा बदल घडला आहे. पूर्वी आयात होणाऱ्या तेलात सर्वाधिक वाटा पामतेलाचा होता तो यंदा सोयाबीन व सूर्यफूल तेलाने घेतला आहे..हा बदल पूर्णपणे जागतिक बाजारपेठ आणि पुरवठा परिस्थितीमुळे घडून आला आहे. पामतेलाची आयात मागील काही वर्षांपासून ७० ते ८० लाख टनांवर स्थिर आहे. याउलट सोयाबीन तेलाची आयात ३५ लाख टनांवरून सुमारे ५० लाख टनांपर्यंत, सूर्यफूल तेलाची आयात २५ लाख टनांवरून जवळपास ३५ लाख टनांपर्यंत वाढली आहे..Edible Oil : खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचं पंतप्रधानांचं लाल किल्ल्यावरून आवाहन.पाम तेलाच्या किमती उच्च पातळीवरइंडोनेशिया आणि मलेशियामधील बायोडिझेल धोरण व हवामानामुळे पामतेलाचा पुरवठा मर्यादित राहिला आहे. त्याच्या किमती उच्च पातळीवरच आहेत. त्याउलट सोयाबीन आणि सूर्यफूल तेल विविध स्रोतांमधून दक्षिण अमेरिका आणि ब्लॅक सी क्षेत्रातून आयात करता येत असल्याने त्याची किंमत तुलनेने स्थिर आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर कमी आहेत. ही स्थिती खाद्यतेलाचे दर कमी करण्यात साहाय्यक ठरत असली तरी सोयाबीनला हमीभावही मिळणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणातील विसंगतीमुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे..Edible Oil Hording : खाद्यतेलाची साठेबाजी रोखण्यासाठी आणणार नवा कायदा.नेपाळमधून शुल्कमुक्त रिफाइंड सोयातेलाची आयातसेफ्टा आणि भारत-नेपाळ व्यापार करारामुळे हे तेल शुल्काशिवाय भारतात येत आहे. यामुळे प्रादेशिक व्यापाराला चालना मिळत असली तरी देशांतर्गत रिफायनिंग उद्योगाला फटका बसत आहे. शुल्कमुक्त रिफाइंड तेलामुळे भारतीय रिफायनरीज कमी क्षमतेवर चालत आहेत. याचा परिणाम देशातील रोजगारावरही दिसत आहे. नेपाळ आणि भारतात आयात शुल्कमुक्त व्यापार होत असल्याने काही देशातील व्यापारी देखील याच मार्गाने भारतात शुल्कमुक्त तेलाचा पुरवठा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले..खाद्यतेलाच्या बाबतीत भारत परदेशावर अवलंबून आहे. देशातील एकूण खपाचा ६० ते ६५ टक्के भाग आयात करावा लागतो. त्यामुळे भारताचे खाद्यतेल क्षेत्र नेहमीच जागतिक बदलांनुसार स्वतःला जुळवून घेत आले आहे. सध्याच्या घडामोडी देखील त्याच प्रक्रियेचा एक भाग आहेत. खाद्यतेल स्वस्त आहे. मात्र शेतकऱ्यांना सोयाबीनचे हमीभावही मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.शंकर ठक्कर, अध्यक्ष, अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.