Pune News: ‘‘जगातील मनुष्यबळ शक्तीचा सर्वात उत्तम स्त्रोत तसेच रोजगाराच्या संधीदेखील भविष्यात भारताकडे असतील. त्यामुळे २०४७ मधील आत्मनिर्भर व विकसित भारताचे स्वप्नं प्रत्यक्षात साकारेल,’’ असा आशावाद नीती आयोगाचे सदस्य डॉ. अरविंद वीरमणी यांनी व्यक्त केला. .राज्य शासनाच्या महाराष्ट्र परिवर्तन संस्था (मित्रा) व केंद्रीय नीती आयोगाच्या ‘स्टेड सपोर्ट मिशन’ (एसएसएम) यांनी संयुक्तपणे गुरुवारी (ता. २५) ‘यशदा’मध्ये आयोजित केलेल्या प्रादेशिक नीती परिसंवादाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे मुख्य आर्थिक सल्लागार व ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, नीती आयोगाचे सहसचिव व एसएसएमचे अभियान संचालक के. एस. रेजिमॉन, नीती आयोगाचे अतिरिक्त सचिव रोहित कुमार, नीती आयोगाचे सदस्य अरविंद वीरमणी, ‘एसएसएम’चे संचालक शोएब अहमद कलाल होते. देशाच्या पश्चिम व दक्षिण विभागातील राज्यांनी या वेळी ‘सुशासन व विकासासाठी परिवर्तनाच्या दिशा’ या विषयावर दिवसभर मंथन केले..Marathwada floods: शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आर्थिक ताकद उभी करणार : योगेश कदम .श्री. परदेशी म्हणाले, ‘‘पूर्वीच्या योजना आयोगाची जागा नीती आयोगाने उत्तम पद्धतीने घेतली आहे. देशाच्या विकासात्मक वाटचालीसाठी नियोजनबद्ध अभ्यास आणि मांडणी करणारा विचारमंच (थिंकटॅंक) म्हणून आयोग काम करतो आहे. सरकारी यंत्रणा सतत वर्तमान समस्या हाताळण्यात व्यस्त असते. त्यामुळे या यंत्रणेला भविष्यकालीन नियोजनाचा विचार करता येत नाही. मात्र, हे काम नीती आयोगाच्या माध्यमातून होते आहे. राज्यांच्या यंत्रणांना सोबत घेत आयोगाची होत असलेली वाटचाल कौतुकास्पद आहे.’.Aditi Tatkare: अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार २ हजार रुपयांची दिवाळी भाऊबीज भेट: मंत्री आदिती तटकरे.विकसित भारतासाठी राज्यांच्या सहभागातून पुढे जाण्याचे ध्येय केंद्राचे आहे, असे श्री. रिजेमॉन यांनी नमूद केले. ‘‘विकसित भारतासाठी सर्व राज्यांचा विकास आणि त्यासाठी हवे असलेले उत्तम नियोजन साधावे लागेल. यात महाराष्ट्र व गुजरात सध्या आघाडीवर दिसतात. मात्र, सर्व राज्यांना पायाभूत विकास, परिवर्तन साधायचे आहे. त्यासाठी प्रशासनातील धोरणात्मक बदल आणि त्यातून समृद्धी अशा उद्दिष्टे साध्य करायची आहे. त्यासाठीच नीती आयोगाने पुढाकार घेतला आहे,’’ असेही ते म्हणाले..विकसित भारताची तयार होतेय ब्ल्यूप्रिंट‘२०४७ मधील विकसित भारत’साठी अनेक देशभर व्यापक बदल करावे लागतील. राज्यांना सोबत घेत नेमके कोणते व कसे बदल करावे याचे विविध पर्याय अभ्यासले जात आहेत. नीती आयोगाच्या प्रादेशिक चर्चासत्र उपक्रमांद्वारे नव्या भारताच्या वाटचालीची एकप्रकारे नीलप्रत (ब्ल्यूप्रिंट) तयार होते आहे, असे या वेळी सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.