New Delhi News: ‘‘ई-कॉमर्स मंचांवरून होणाऱ्या पीक संरक्षण साहित्य, कीटकनाशकांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्याची आवश्यकता असून केंद्र सरकारने यासाठी योग्य नियमावली तयार करावी. तसेच बनावट उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू नयेत यासाठी अधिकृतता प्रमाणपत्र बंधनकारक केले जावे,’’ अशी मागणी कीटकनाशके उत्पादकांची संघटना असलेल्या ‘क्रॉपलाइफ’ने केली आहे. .कीटकनाशकांसारख्या पीक संरक्षण सामग्री उत्पादकांची परिषद आज दिल्लीत झाली. या उत्पादनांच्या वितरणात ई-कॉमर्सची भूमिका, शेतकऱ्यांची सुरक्षा, उत्पादनाची गुणवत्ता, नियम पालन यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या परिषदेनंतर क्रॉपलाइफचे अध्यक्ष अंकुर अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, ‘‘ई-कॉमर्स मंचांवरून पीकसंरक्षण औषधे व कीटकनाशकांची होत असलेली विक्री, त्यासाठीचे परवाने, या उत्पादनांच्या विक्रीची नोंद (ट्रेसेबिलिटी), त्याचप्रमाणे बनावट उत्पादनांचीही होणारी विक्री ही आव्हाने उत्पादकांसमोर आहेत..Pesticide Regulations: लेबलवर ‘पीएच’संदर्भातील सूचना देणे बंधनकारक .त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नियमावली तयार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सरकारने विद्यमान कीटकनाशक कायदा, १९६८ अंतर्गत स्पष्ट नियम जारी करावेत आणि ऑनलाइन विक्रीचे नियमन करण्यासाठी प्रस्तावीत कीटकनाशक व्यवस्थापन विधेयकाच्या मसुद्यात स्पष्ट तरतुदी समाविष्ट कराव्यात..कीटकनाशक विक्रीची भारतातील बाजारपेठ २६ हजार कोटी रुपयांची आहे. देशांतर्गत कीटकनाशकांच्या बाजारपेठेत ऑनलाइन विक्रीचा वाटा एक टक्क्यापेक्षा कमी आहे, परंतु २०२१ मध्ये सरकारने ऑनलाइन विक्रीला परवानगी दिल्यापासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कीटकनाशके विक्रीचे प्रमाण वाढले आहे..Tractor Regulations: ट्रॅक्टरधारकांपुढील नवी आव्हाने.त्याचा संदर्भ देत अंकुर अग्रवाल म्हणाले, ‘‘विशिष्ट कीटकनाशके हाताळण्यासाठी किरकोळ विक्रेता किंवा वितरकाला अधिकृत करण्यासाठी कीटकनाशक उत्पादकाकडून प्रमाणपत्र जारी केले जाते. परंतु, ई-कॉमर्स कंपन्यांसाठी या प्रमाणपत्राच्या आवश्यकतेबाबतच नियमांमध्ये स्पष्ट उल्लेख नाही. यामुळे कोणत्याही जबाबदारी शिवाय ई-कॉमर्स मंचाना कीटकनाशकांची विक्री करण्याची मुभा मिळते..योग्य नियमावली आवश्यकप्रस्तावित कीटकनाशक व्यवस्थापन विधेयकात बनावट कीटकनाशकांचा सामना करण्यासाठी डिजिटल प्रशासन, ऑनलाइन नोंदणी आणि ट्रेसेबिलिटीवर भर आहे. मात्र ऑनलाइन विक्रीच्या स्पष्ट नियमांचा उल्लेख नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने योग्य नियमावली आवश्यक आहे, असे मत क्रॉपलाईफचे अध्यक्ष अंकुर अग्रवाल यांनी व्यक्त केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.