Kolhapur News: देशातील साखर उत्पादनाने दीडशे टनांचा टप्पा ओलांडला आहे. १५ जानेवारीअखेर उत्पादनात अव्वल क्रमांक कायम ठेवताना महाराष्ट्राने ६४.६० लाख टन साखर तयार केली आहे. महाराष्ट्राने दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशपेक्षा तब्बल वीस लाख टन अधिक साखर उत्पादित केली आहे. .त्या खालोखाल, कर्नाटकात ३०.७० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. देशभरात आतापर्यंत १७६३.७४ लाख टन ऊस गाळप झाला आहे. मागील हंगामात याच कालावधीत १४८४.०४ लाख टन ऊस गाळप झाला होता. यंदा गाळपात २७९.७० लाख टनांची वाढ असून, ती सुमारे १८.८५ टक्यांनी अधिक आहे..Sugar Industry: आर्थिक आरोग्याची त्रिसूत्री.देशातील एकूण साखर उत्पादन १५८.८५ लाख टनांवर पोहोचले आहे. मागील वर्षी याच काळात हे उत्पादन १३०.६० लाख टन होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात २८.२५ लाख टनांची वाढ नोंदली गेली असून ती २१.६३ टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे, ही वाढ केवळ महाराष्ट्रामुळेच झाली..गेल्या वर्षी या कालावधीत महाराष्ट्रात ४३ लाख टन साखर तयार झाली होती. यंदा ती ६४.६० लाख टनांवर गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात सुमारे २१ लाख टनांनी साखरेच्या उत्पादनात वाढ झाली आहे..राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अंदाजानुसार, यंदाच्या हंगामअखेर (२०२५-२६) देशातील एकूण साखर उत्पादन ३१५ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी हे उत्पादन २६१.८० लाख टन होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ५३.२० लाख टनांची वाढ होऊ शकते. तसेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर निर्मितीत २०.३२ टक्के वाढ होऊ शकते..Sugar Industry Crisis: सहकारी साखर कारखान्यांना घरघर.गाळप घेतलेले कारखाने ५१९महाराष्ट्र २०४उत्तर प्रदेश ११९कर्नाटक ७६सरासरी साखर उतारा (टक्के)उत्तर प्रदेश ९.८०महाराष्ट्र ९.००कर्नाटक ८.०५राज्यनिहाय.साखर उत्पादन (लाख टनांत)महाराष्ट्र ६४.६०उत्तर प्रदेश ४५.७०कर्नाटक ३०.७०गुजरात ३.९५बिहार २.९०पंजाब १.७०.मध्य प्रदेश १.७०तमिळनाडू १.८५हरियाना १.९०तेलंगणा १.२०आंध्र प्रदेश ०.३०उत्तराखंड १.७०उर्वरित भारत ०.६५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.