Market Bulletin:सोयाबीनमध्ये सुधारणा देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात आज काहीशी सुधारणा दिसून आली. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचा भाव क्विंटलमागे ५० रुपयांनी वाढवला होता. तर बाजार समित्यांमध्येही काहीशी सुधारणा झाली होती. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव सरासरी ६ हजार ३०० ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सरासरी ५ हजार ७०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनच्या भावातील सुधारणा पुढील काही दिवस कायम राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसातील वाढ कायमदेशातील बाजारात गुणवत्तापूर्ण कापसाला चांगला उठाव आहे. कापसाच्या भावात झालेली वाढ टिकून आहे. सीसीआयकडे कापसाचा चांगला साठा आहे. यामुळे सीसीआयने कापूस विक्रीचा भाव वाढवला आहे. सीसीआयने कापूस विक्रीचा भाव खंडीमागे मागील दोन महिन्यांमध्ये ९ हजार रुपयाने वाढवला आहे. तर बाजारात कापसाला गुणवत्तेप्रमाणे ८ हजार २०० ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापसाची बाजातील आवक कमीच झालेली आहे. देशातील उत्पादन कमी असल्याचा बाजारावर परिणाम दिसून येत आहे. कापसाच्या भावातील सुधारणा काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: हळदीचा भाव स्थिर; सोयाबीन भाव टिकून, कापूस तेजीतच, पपईला मागणी तर काकडीला उठाव.कलिंगडाची आवक टिकून राज्यातील बाजारात मगील काही दिवसांपासून कलिंगडाची आवक वाढली आहे. उन्हामुळे कलिंगडाला मागणी चांगली आहे. पण आवकेचा दबाव असल्यामुळे बाजारात भावपातळी काहीशी टिकून आहे. सध्या बाजारात कलिंगड प्रतिक्विंटल सरासरी ८०० ते ११०० रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे विकले जात आहे. कलिंगडाला पुढील काळातही चांगली मागणी राहणार आहे. पण वाढत्या उन्हामुळे कलिंगड पिकाला फटका बसत आहे. याचा परिणाम उत्पादनावर होत असून काही दिवसांनंतर बाजारातील आवक कमी होत जाईल, असे शेतकरी सांगत आहेत. आवक कमी होत गेल्यास बाजाराला याचा आधार मिळू शकतो, असे जाणकारांनी सांगितले. .Agrowon Podcast: हिरव्या मिरचीत सुधारणा; सोयाबीन भाव टिकून, कापसाला उठाव कायम, आल्याचे दरात सुधारणा तर शेवगा आवक टिकून.मोहरीच्या भावात तेजीदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून मोहरीच्या भावातही तेजी आली आहे. मोहरीचे भाव तेल आणि पेंडेला मागणी असल्यामुळे वाढले आहेत. मोहरी पेंडेला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहेत. सरकारने यंदा मोहरीचा हमीभाव प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार २०० रुपये जाहीर केला होता. तर बाजारात सध्या मोहरीला प्रतिक्विंटल ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मोहरीची बाजारातील आवक सुरु असतानाही मोहरीच्या भावात तेजी आहे. मोहरीच्या भावातील सुधारणा पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कांदा दबावातचदेशातील बाजारात कांद्याचा भाव दबावातच आहे. बाजारातली सध्या कांद्याची आवक चांगली सुरु आहे. निर्यात अद्यापही सरासरीपेक्षा कमीच होत आहे. आखाती देशांना निर्यात ठप्प झाली आहे. वाढत्या उन्हामुळे काही भागात कांदा पिकाला उष्णतेचा फटका बसत आहे. त्यात ढगाळ हवामानाचाही पिकावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना या सर्व कारणांमुळे बाजारात कांदा विकावा लागत आहे. बाजारातील आवक जास्त असल्याने दरावर दबाव आला आहे. सध्या कांदा ५०० ते ९०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. आवकेचा दबाव पुढील काही आठवडे राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे भावावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.