Chhatrapati Sambhajinagar News : बाजारपेठेत काहीसे वाढलेले कापसाचे दर पुन्हा घसरले आहेत. तर, दुसरीकडे शासनाची ‘सीसीआय’मार्फत खरेदी २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. .आधारभूत किमतीने कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांनी डिसेंबरमध्ये सीसीआयच्या ॲपवर नोंदणी केली. त्यानंतर साधारणत: पंधरा-वीस दिवसांपूर्वी कापसाचे दर खासगी बाजारात ८१०० च्या पुढे गेले होते. दुसरीकडे शासकीय खरेदी ७४०० ते ८१०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान होत असली तरी त्यातही ग्रेड, कटता, कवडी हे प्रकार आहेतच..Cotton Arrival: अकोट बाजारात कापसाच्या आवकेत वाढ.त्यामुळे शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीने कापूस खरेदीऐवजी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्रीचा पर्याय निवडला. आता पुन्हा एकदा कापसाचे दर ७१०० ते ७२०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले. त्यामुळे आधारभूत किमतीने आपला कापूस विकला जावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे..भारतीय कपास निगम लिमिटेडने २८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीने कापूस विक्रीसाठी स्लॉट बुक करून आपला कापूस विकण्याची सूचना काढली. स्लॉट बुक करण्यासाठीची व्यवस्था अत्यंत घाईची आहे. काही क्षणात दिवसभरासाठीचे सेंटर वरील स्लॉट बुक होतात..Cotton Fair: कारंजात विशेष कापूस पीक प्रकल्पांतर्गत मेळावा.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुसऱ्या दिवशी स्लॉट बुक करण्याशिवाय पर्याय उरत नाही. दुसऱ्या दिवशीही तसेच झाल्यास त्या पुढील दिवशी स्लॉट बुक करण्यासाठी काळजी करावी लागते. उरलेल्या दिवसात आपला स्लॉट बुक करून कापूस विकला जाईल का याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे..खासगी बाजारात कापसाचे पडलेले दर लक्षात घेता आधारभूत किमतीने कापूस खरेदीसाठी मुदत वाढविता येणार नाही का, असाही प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. सोयगाव तालुक्यातील अनेक गावांत अजूनही शेतकऱ्यांनी कापूस पडून आहे. आजवर सुमारे ३० ते ४० टक्के कापूस विकला गेला असला तरी चाळीस ते पन्नास टक्के कापूस अजूनही बाकी असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली..कापसाचे दर घसरले आहेत. आता आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने कापूस का विकावा, हा प्रश्न आहे. आमच्या गावात अजूनही सुमारे ४००० क्विंटलपेक्षा जास्त कापूस शेतकऱ्यांकडे आहे.दिलीप पाटील, कापूस उत्पादक, जरंडी, ता. सोयगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.