Amravati News: धामणगाव रेल्वे बाजार समितीअंतर्गत खासगी जिनिंगमध्ये आवक झालेल्या या हंगामातील पहिल्या कापसाला ७११० रुपये क्विंटलचा दर मिळाला. अग्रवाल नॅचरल फायबर या जिनिंगमध्ये कापसाची खरेदी झाली. सीसीआयची खरेदी राज्यात बुधवारपासून (ता. १५) सुरू होणार आहे. .केंद्र शासनाने २०२५-२६ या वर्षातील हंगामातील कापसासाठी मध्यम लांबीच्या धाग्याकरिता ७७१० तर लांब धाग्याकरिता ८११० रुपयांचा हमीभाव निश्चित केला आहे. या वर्षी संततधार पावसाचा फटका बसत कापसाची प्रत खालावली आहे. त्याबरोबरच उत्पादकतेवर देखील अतिवृष्टी व पावसाचा परिणाम झाल्याचे सांगितले जाते.. CCI Cotton Procurement: ३.२५ लाख शेतकऱ्यांची कपास किसान अॅपवर नोंदणी; १५ ऑक्टोबर पासून कापसाची हमीभावावर खरेदी सुरु होणार .त्यामुळे बाजारात दर हमीभावापेक्षा कमी राहतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात भारतीय कापूस महामंडळावर (सीसीआय) कापूस खरेदीचा दबाव राहणार आहे. सीसीआयची खरेदी बुधवारपासून (ता. १५) सुरू होणार असून त्याकरिता साडेतीन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे..CCI Cotton Procurement : सीसीआयच्या कापूस खरेदी नोंदणीची मुदत वाढवा .दरम्यान, धामणगाव रेल्वे बाजार समितीअंतर्गत खासगी जिनिंग व्यावसायिकांकडे कापसाची आवक झाली. मुहूर्ताच्या या कापसाला ७११० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. या वेळी कापसाची पहिली गाडी आणणारे जळगाव आर्वी येथील शेतकरी आकाश भोसले यांचा शेला, टोपी देत सन्मान करण्यात आला..या वेळी जिल्हा बॅंकेचे संचालक श्रीकांत गावंडे, बाजार समिती संचालक राधेश्याम चांडक, प्रदीप राठी, रितेश राठी, पवन राठी, मधुर राठी, प्रकाश राठी, सूरज लोया, प्रवीण पनपालिया, नंदू राठी, मुकेश पनपालिया, पंकज लोया, रूपेश वानखडे, सागर बानोडे, नितीन गंगन, सचिन राठी, नंदू लाहोटी, उमंग अग्रवाल, संजय अग्रवाल यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.