Cotton MSP Procurement: कापसाची हमीभावाने एक ऑक्टोबरपासून खरेदी
Farmer Support: खरीप हंगामात १ ऑक्टोबरपासून कापसाची किमान आधारभूत किंमतीने (एमएसपी) खरेदी होणार आहे. त्यासंबंधी तयारीचा आढावा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २) नवी दिल्ली येथे बैठकीत घेण्यात आला.