Pune News : सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क काढले आणि सीसीआयची कापूस विक्री कमी भावात सुरुच असल्याने कापूस बाजारावर दबाव आला आहे. सीसीआयने आतापर्यंत ७६ लाख गाठी कापूस विकला. सध्या सीसीआयकडे २४ लाख गाठी कापूस शिल्लक आहे. हा कापूस सीसीआय सप्टेंबर महिन्यात विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे दरावरील दबाव कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. .अमेरिकेने भारताच्या कापडावर ५० टक्के आयात शुल्क लावल्याने निर्यात अडचणीत आली आहे. अमेरिकेला एकूण निर्यातीपैकी ३५ टक्के निर्यात होते. तर देशातील एकूण कापड उत्पादनापैकी ७ टक्के निर्यात होते. .Cotton Import: कापूस आयातीला विरोध.म्हणजेच अमेरिकेचे मार्केट भारतीय शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाचे आहे. पण आता निर्यात अडचणीत आल्याने उद्योगांनी निर्यात कमी होण्याची भीती व्यक्त करत सरकारकडे कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क काढण्याची मागणी केली होती. सरकारने उद्योगांची मागणी मान्य करत ११ टक्के शुल्क काढले..सरकारने १८ ऑगस्ट रोजी कापूस आयात शुल्क काढल्याची अधिसूचना काढली. त्यानंतर आयात शुल्क काढण्याच्या निर्णयाला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या निर्णयामुळे देशात मात्र कापसाचे भाव कमी झाले. .Cotton Import Duty: आयातीच्या लोंढ्यात पांढरे सोने काळवंडणार.यंदा सुरुवातीपासूनच कापूस बाजारात मंदी असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला नव्हता. भाव कमी असल्याने सीसीआयची खरेदी यंदा १०० लाख गाठींवर पोचली होती. परिणाम मागील दोन महिन्यांपासून सीसीआयचाच कापूस बाजारात विकला जात आहे..सरकारने आयात शुल्क कमी केल्यापासून सीसीआयने आपल्या कापूस विक्रीचे भाव खंडीमागे २५०० रुपयाने कमी केले. सीसीआयकडे सध्या २४ लाख गाठी कापूस आहे. सीसीआयने आतापर्यंत ७६ लाख गाठी कापूस विकला. उरलेला कापूस सीसीआय याच महिन्यात विकण्याचा प्रयत्न करणार आहे. नव्या हंगामात कापूस खरेदी वाढू शकते, हे लक्षात घेऊन सीसीआयने तयारी केली आहे..सीसीआयने यंदा कापूस खरेदीसाठी नोंदणी ऑनलाईन केली आहे. तसेच आपल्या सोयीप्रमाणे स्लाॅट बूक करून शेतकऱ्यांना कापूस विकता येईल. तसेच सीसीआय १५ ऑक्टोबरपासून देशात कापूस खेरदीसाठी ५५० खेरदी केंद्रे सुरु करणार आहे. यापैकी महाराष्ट्रात १५० खरेदी केंद्रे असतील. यंदा कापसाचे भाव दबावातच राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्रीचे नियोजन करावे, असे अवाहन अभ्यासकांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.