Jalgaon News: खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी सुरू झाली आहे. परंतु पावसाने पीकहानी होत असून, दरही कमी आहेत. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. १४ लाख एकूण खरिपातील क्षेत्रात एकट्या कापसाची खानदेशात साडेसात लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. .यात खानदेशात सुमारे दोन लाख हेक्टरवर पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाची लागवड झाली आहे. ही लागवड २२ ते २५ मेपासून सुरू झाली. पोळा सणाला, मे महिन्यात लागवड केलेल्या कापूस पिकात बोंडे उमलतात. त्यात वेचणी करावी लागते. यंदाही या कालावधीत लागवड केलेल्या कापूस पिकात वेचणी सुरू झाली आहे. हलक्या, मध्यम, उताराच्या जमिनीत बोंडे उमलू लागली आहेत. वेचणीला सुरुवात झाली आहे. पण पावसाने हानी झाली आहे..Cotton Rate: उत्तर भारतातील काही बाजारांमध्ये नव्या कापसाची आवक सुरु.कमी दरांमुळे फटकाबाजारात कापूस आवक कमी आहे. कापूस लागवडही कमी आहे. दुसरीकडे कापूस दर अस्थिर आहेत. कापसाची गणेशोत्सवात काही जिनिंग प्रेसिंग कारखानदारांनी ७१०० ते ७६०० रुपये प्रति क्विंटल दरात खरेदी करून खरेदीचा मुहूर्त केला होता. पण सध्या कापूसदर कमाल ७००० व किमान ५००० रुपये प्रति क्विंटल, असे आहेत..Cotton Bag Procurement Issue: कापूस पिशवी खरेदीवर लेखापरीक्षकांचा ठपका .ओलावा किंवा आर्द्रतायुक्त कापसाचे कारण सांगून ५००० रुपये दर दिला जात आहे. जुन्या किंवा मागील हंगामातील दर्जेदार कापसाला ७००० रुपये दर सांगितला जात आहे. कापूस शेतकऱ्यांच्या घरात येत असतानाच दरांचा तिढा सुरू झाला आहे..दुसरीकडे कापूस वेचणी रखडत सुरू आहे. मजूर मिळत नाहीत. मजुरी व अन्य खर्च वाढला आहे. अजून हवा तेवढा कापूस शेतकऱ्यांकडे नाही. पण दसरा सणाला कापसाचा बऱ्यापैकी साठा शेतकऱ्यांकडे राहील. या काळात दरवाढ होईल व शासकीय खरेदीसही लवकर सुरुवात होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.