Agri Supply Chain Issue: श्रीलंकेतील कोलंबो बंदरावर निर्माण झालेल्या अभूतपूर्व गर्दीचा आणि आंतरराष्ट्रीय जलवाहतूक व्यवस्थेतील गोंधळाचा मोठा फटका कांदा निर्यातदारांना बसला आहे. या संकटामुळे परदेशात पाठविण्यात आलेले तब्बल ६५ कांद्याचे कंटेनर माघारी परत आल्याने निर्यातदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे..जूनच्या सुरुवातीला उन्हाळी कांद्याचे कंटेनर कोलंबोमार्गे विविध देशांकडे रवाना करण्यात आले होते. जहाज सुटण्याची अंतिम तारीख ३० मे होती. मात्र कोलंबो बंदरावरील प्रचंड गर्दीमुळे जहाज नियोजित वेळेत निघू शकले नाही..Agricultural Exports: भारतीय शेती उत्पादनांना मागणी कायम, निर्यातीत २०२५-२६ मध्ये २.८ टक्के वाढ, उच्च- मूल्य उत्पादनांत वाढीचा कल.त्यानंतर काही आंतरराष्ट्रीय जहाज कंपन्यांनी मार्ग बदलून भारतातील जेएनपीए आणि विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरांकडे जहाजे वळविली. सुमारे १५ दिवस कंटेनर प्रवासात आणि प्रतीक्षेत राहिल्याने कांद्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम झाला..Indian Defence Exports: भारत संरक्षण उत्पादनातील सर्वांत मोठा निर्यातदार होईल: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह.विशेषतः दमट हवामानामुळे कांद्याची प्रतवारी घसरली. काही कंटेनर पर्यायी मार्गाने पाठविण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर काही कंटेनर विविध बंदरांवरच अडकून पडले. अखेर परदेशातील खरेदीदारांनी माल स्वीकारण्यास नकार दिल्याने ६५ कंटेनर भारतात परत आणावे लागले..स्वतंत्र यंत्रणेची गरजया घटनेमुळे कांदा निर्यातदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. निर्यातदारांनी केंद्र सरकारकडे नुकसानभरपाई, विशेष आर्थिक मदत, निर्यात विमा योजना, कृषी निर्यातीसाठी स्वतंत्र जोखीम संरक्षण निधी तसेच जहाज कंपन्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक वाहतूक साखळीतील अशा अडचणींमुळे नाशिवंत कृषी मालाच्या निर्यातीसाठी स्वतंत्र संरक्षण यंत्रणा उभारण्याची गरज अधिक तीव्रतेने समोर आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.