Tabacco Industry GST: सिगारेट, पानमसाला कंपन्यांना दणका
Tax Policy: केंद्र सरकारने पानमसाला, सिगारेट्स, तंबाखू आणि तत्सम उत्पादनांवर ४० टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बिडीवर १८ टक्के जीएसटी लागू होईल. १ फेब्रुवारीपासून हे नवीन दर लागू होणार असून, याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.