Sangli News: बेदाणा दर पाडण्याच्या हेतूने सांगली आणि तासगावमधील काही व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक अफगाणिस्तानचा म्हणून चीनचा बेदाणा सौद्यात आणला आहे, असा आरोप द्राक्ष संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरात प्रति किलो ४० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. याचा फटका बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे..गतवर्षीच्या हंगामातील जवळपास दीड हजार ते दोन हजार गाडी म्हणजे पंधरा हजार ते वीस हजार टन बेदाणा शिल्लक आहे. हा बेदाणा नवीन बेदाणा येईपर्यंत म्हणजे जवळपास दोन महिने पुरवठा होईल इतका आहे..Raisin Research Center: सांगलीत बेदाणा संशोधन केंद्रास मंजुरी.वास्तविक पाहता गत हंगामात बेदाण्याचे उत्पादन घटल्याने चांगले दर मिळत आहे. गेल्या महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. अशा स्थितीमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अफगाणिस्तानचा बेदाणा येणार असल्याची चर्चा सुरू होती. किती बेदाणा येणार या बाबत स्पष्टता नव्हती..गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानच्या नावाखाली चीनचा बेदाणा देशभरातील बाजारपेठेत आला आहे. सांगली, तासगाव या दोन ठिकाणी पाच हजार टन बेदाण्याची आवक झाली असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत..वास्तविक पाहता चांगल्या बेदाण्याला २५० ते ४१० रुपये प्रति किलो असे दर मिळत आहे. यंदाही अतिपावसाचा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. त्यामुळे उत्पादन घटल्याने त्याचा थेट परिणाम बेदाणा निर्मितीवर होणार असून हंगाम लांबणीवर जाणार आहे. या साऱ्या गोष्टी लक्षात घेत दर कमी करण्याचा घाट या व्यापाऱ्यांनी घातला आहे, असा आरोप बेदाणा उत्पादक शेतकरी करू लागला आहे..Raisin Production: बेदाणा निर्मिती हंगाम २५ दिवसांनी लांबणार.बेदाणा चीनचा आहे. हा बेदाणा दुबई मार्गे अफगाणिस्तानमध्ये आला आणि इथल्या निर्यातदारामार्फत अमृतसर मध्ये आला. चीनचा बेदाणा अफगाणिस्तानच्या नावाने ब्रॅण्डिंग करून तो भारतात आणला आहे. मुळात बेदाणा कायदेशीर आणला की बेकायदेशीर हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात बेदाण्याचे उत्पादन होत असताना बाहेरचा बेदाणा व्यापाऱ्यांनी का आणला आहे. हा निष्कृष्ट बेदाणा आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी द्राक्ष संघाने केली आहे..चीनमध्ये गत महिन्यापासून बेदाण्याचा हंगाम सुरू झाला आहे. हा बेदाणा अफगाणिस्तानच्या नावाखाली भारतात आणला आहे. मात्र हा बेदाणा कोणत्या निकषानुसार आणला जातो. बेदाण्याचे दर पाडण्यासाठी सांगली आणि तासगावच्या व्यापाऱ्यांनी हा बेदाणा विकत घेतला आहे. त्या व्यापाऱ्यांवर कारवाई व्हावी.मारुती चव्हाण, उपाध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ.महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकरी बेदाण्याचे उत्पादन करतात. निर्यात वाढीसाठी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया. जे चुकीचे काम करून उद्योगाला बदनाम करीत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहू नये.सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.