Beijing News: चीन व रशियाकडून इंधन आयात करणाऱ्या इतर देशांवर आयातशुल्क लादण्यासाठी अमेरिकेने ‘जी ७’ आणि ‘नाटो’ देशांना केलेले आवाहन म्हणजे धमकाविण्याची ठराविक कृती असल्याचे मत चीनने व्यक्त केले आहे. अमेरिकेच्या या आर्थिक दबावाच्या आवाहनाचे पालन केल्यास प्रत्युत्तरादाखल उपाययोजना करण्याचा इशाराही चीनने दिला आहे..व्यापार आणि आर्थिक मुद्दयावर चर्चा करण्यासाठी अमेरिका व चीनचे शिष्टमंडळ सोमवारी, दुसऱ्या दिवशी चर्चेसाठी एकत्र येत असतानाच चीनने अमेरिकेचा दबाव झुगारला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान म्हणाले, की रशियासह जगभरातील देशांबरोबर चीनचे आर्थिक आणि ऊर्जा सहकार्य हे वैध, कायदेशीर आणि निष्कलंक आहे..US Import Tarrif: आयातीचा उंट तंबूत नको.रशियाकडून इंधनखरेदी केल्याबद्दल चीनवर सामुदायिकरित्या अधिक आयातशुल्क लावण्याच्या अमेरिकेने जी ७ आणि नाटो देशांना केलेल्या आवाहनाच्या वृत्तावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की अमेरिकेची ही कृती म्हणजे एकतर्फी धमकाविणे आणि आर्थिक दडपशाही आहे. हे आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे गंभीर उल्लंघन असून जागतिक औद्योगिक आणि पुरवठा साखळीच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे..अशा प्रकारचा दबाव व दडपशाही लोकप्रिय नाही आणि त्यामुळे कोणतीही समस्या सुटू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे. रशिया-युक्रेन संघर्षावर चीनची भूमिका स्पष्ट आहे. या संघर्षाच्या पहिल्या दिवसापासून चीनने निःपक्ष भूमिका घेत शांतता चर्चेला प्रोत्साहन दिले आहे. संवाद व चर्चा हेच या समस्येवरील उपाय आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले..US Impoty Tarrif: प्रत्येक देशावर आयात शुल्क लादण्याचा अधिकार ट्रम्प यांना नाही.युक्रेन संघर्ष थांबविण्यात मदत म्हणून चीनवर ५० ते १०० टक्के आयातशुल्क लावावे, तसेच रशियाकडून इंधनखरेदी थांबवा, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी नाटो देशांना केले होते. त्याचप्रमाणे, अमेरिकेचे अर्थमंत्री बेसेंट यांनीही जी ७ देशांच्या अर्थमंत्र्यांना अशाच प्रकारचे आवाहन केले होते..एकतर्फी, बेकायदा निर्बंधाचा आम्ही निषेध करतो. वैध हक्कांना धक्का लागल्यास चीन प्रतिउपाय योजेल आणि आपले सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासहित अबाधित ठेवेल. अमेरिका, युरोपसह बहुतेक देशांचा रशियाबरोबरचा व्यापार सुरूच आहे. चीन व रशियातील व्यापार व इतर सहकार्य जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसारच होत आहे. लिन जियान, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय, चीन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.