Pune News: देशातील बाजारात हरभऱ्याची आवक वाढत असून, आयातही सुरू आहे. त्यामुळे हरभऱ्याला हमीभावापेक्षा ७०० ते एक हजार रुपये कमी भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हमीभावाने खरेदी सुरू करावी आणि आयात शुल्क वाढवावे, अशी मागणी अभ्यासकांनी केली आहे..फेब्रुवारी महिन्यात हरभऱ्याचे भाव १० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्यांत आवक चांगली सुरू आहे. तर, पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आवक वाढणार असून, याचा भावावर दबाव आला आहे. यंदा देशात हरभऱ्याची लागवड ५ टक्क्यांनी वाढली आहे. हरभरा पिकासाठी यंदा पोषक हवामान असल्याने उत्पादकताही अधिक येण्याची शक्यता आहे. देशातील उत्पादन वाढीचा अंदाज असल्याने भाव कमी झाले आहेत..Chana Harvesting: खानदेशात हरभरा काढणीस वेग.हमीभाव मिळेनाकेंद्र सरकारने यंदा हरभऱ्यासाठी ५८७५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तर सध्या बाजारात हरभरा ४८०० ते ५२०० रुपयांनी विकला जात आहे. म्हणजेच सध्या हरभऱ्याला हमीभावापेक्षा ७०० ते एक हजार रुपये कमी भाव मिळत आहे. आवकेचा दबाव पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे हमीभावाने खरेदी सुरू होण्याची गरज आहे. .Chana Crop Protection: हरभऱ्यातील मर रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन.आंध्र प्रदेशात ९४,५०० टन खरेदीला परवानगी मिळाली आहे. तर कर्नाटकात १ लाख टनांची खरेदी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने खरेदीसाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे. मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाही. हमीभावाने खरेदी सुरू झाली तरच शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो, असे अभ्यासकांनी सांगितले आहे..आयातीचा दबावदेशात सध्या हमीभावापेक्षा कमी भावात हरभऱ्याची आवक होत आहे. टांझानिया आणि ऑस्ट्रेलियातून ५३०० ते ५५०० रुपयांनी हरभऱ्याची आयात होत आहे. आयात मालाची गुणवत्ताही चांगली आहे. त्यामुळे प्रक्रियादार या मालाला पसंती देत आहेत. याचा दबाव देशातील बाजारावर येत आहे. सरकारने हरभरा आयातीवर केवळ १० टक्के शुल्क लावलेले आहे. त्यामुळे हमीभावापेक्षा कमी भावात आयात होत आहे. सरकारने हरभरा आयात शुल्क वाढवून किमान ३० टक्के करावे, अशी मागणीही अभ्यासकांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.