Chana MSP Procurement Deadline Extension: केंद्र सरकारने अखेर राज्यात हमीभावाने हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु अनेक केंद्रांवर बारदाना उपलब्ध नाही. तसेच, काही भागात आता गोदामांची समस्या निर्माण होत आहे. यामुळे मुदतवाढीच्या काळातही हरभरा खरेदीचा टक्का वाढण्याची शक्यता कमीच असल्याचे काही केंद्र चालकांनी सांगितले. .हरभरा भाव कमी असल्याने राज्यात हमीभावाने खरेदी सुरू करण्यात आली आहे. राज्यात यंदा ७ लाख ६१ हजार टन खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर शेतकऱ्यांना १ मार्च ते ३१ मार्चदरम्यान हमीभावाने हरभरा विक्रीसाठी नोंदणीची मुदत देण्यात आली होती. तर खरेदीची मुदत २९ एप्रिलपर्यंत देण्यात आली होती..हरभरा उत्पादन यंदा चांगले राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भाव दबावात आहेत. सरकारने यंदा हरभऱ्यासाठी प्रतिक्विंटल सरकारी ५ हजार ८७५ रुपये हमीभाव जाहीर केला. तर बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सुरुवातीपासूनच ४ हजार ७०० ते ५ हजार २०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे..Chana Price: आधारभूत दरानेच हरभरा विक्री करा.यामुळे हरभरा खरेदीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. युद्धामुळेही हरभऱ्यासह कडधान्यांचेदेखील भाव दबावात आहेत. या काळात शेतकऱ्यांना हमीभावाचा आधार आवश्यक आहे. पण शेतकरी नोंदणीची मुदत ३१ मार्चला संपली होती. ही मुदत वाढवावी, अशी मागणी शेतकरी करत होते. त्यानुसार केंद्र सरकारने हरभरा खरेदीसाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणी करून आपला हरभरा हमीभावाने विकता येणार आहे. पण, खरेदी केंद्रांवर उद्दिष्टाच्या निम्मीही खरेदी झाली नसल्याचे चित्र आहे..केवळ ४० टक्केच खरेदीकेंद्र सरकारने राज्यात ७ लाख ६१ हजार टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. परंतु, आतापर्यंत उद्दिष्टाच्या केवळ ४० टक्केच खरेदी झाली. राज्यात ५ एप्रिलपर्यंत ३ लाख ३ हजार टन हरभरा खरेदी झाला. राज्यातील २ लाख ८५ हजार शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २५ हजार शेतकऱ्यांचाच हरभरा खरेदी झाला आहे..Chana MSP Procurement Centers: सोलापूर जिल्ह्यात केवळ बार्शीतच हमीभाव खरेदी केंद्र सुरू.बारदाना, गोदाम टंचाईहरभरा आणि तूर खरेदीत सध्या बारदाना टंचाई भासत आहे. त्यातही मार्केटिंग फेडरेशनच्या ८० टक्के खरेदी केंद्रांवर बारदाना उपलब्ध नाही. पणन विभागाच्या काही केंद्रांवरही बारदाना नाही. यंदा खरेदी केंद्रांना बारदाना पुरवण्याची जबाबदारी पणन विभागाने घेतलेली आहे. पण यंदा सुरुवातीपासूनच बारदाना उपलब्धतेचा प्रश्न कायम आहे. आता अनेक भागांत खरेदी केलेला माल साठविण्यासाठी गोदामे उपलब्ध नसल्याचे काही केंद्रचालक सांगत आहेत. यामुळे भाव कमी असताना आणि शेतकरी हमीभावाने विक्रीसाठी इच्छुक असतानाही निर्धारित उद्दिष्टही साध्य होऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे..तुरीची उद्दिष्टाच्या १२ टक्केच खरेदीकेंद्र सरकारने यंदा ३ लाख ३७ हजार टन तूर खरेदीचे उद्दिष्ट राज्याला दिले आहे. परंतु, ५ एप्रिलपर्यंत राज्यात केवळ ४१ हजार ५१५ हजार टन तूर खरेदी झाली. म्हणजेच उद्दिष्टाच्या केवळ १२ टक्केच खरेदी झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.