Jalgaon News: खानदेशात केळीची आवक घटली आहे. दर किमान ५०० तर कमाल दर १२०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहेत. दर्जेदार केळीला मागणी असून, केळीची पाठवणूक उत्तरेकडे व आखातात केली जात आहे. .दिवाळी सणामुळे रखडलेल्या केळी काढणीस आता वेग आला. यातच केळीच्या आवकेत मागील आठवड्यात घट झाली असली तरी दरात मोठी सुधारणा झालेली नाही. केळीला खानदेशात उठाव बऱ्यापैकी आहे..Kurundkar Banana Chips: कुरुंदकर कंपनीची केळी चिप्स निर्मिती .आवकेत घटकेळीची आवक खानदेशात सध्या प्रतिदिन १६० ते १७० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी आहे. या आवकेत मागील सात ते आठ दिवसात सुमारे ३० ते ३२ ट्रकने घट झाली आहे. बऱ्हाणपुरातही केळी आवक ९१ ते ९२ ट्रक (एक ट्रक चार ते १० टन क्षमता) एवढी आहे. दर्जेदार केळी खानदेशात काढणीवर आहे. या केळीस उठावही आहे. पण दर कमी असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. .परदेशात पाठवणुकीच्या केळीचे दर १२०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. बॉक्समध्ये पॅकिंगच्या केळीचे दर ८०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. क्रेटमध्ये किंवा फण्या करून राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, नागपूर व मुंबई आदी भागांत पाठवणुकीच्या केळीचे दर ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत..Banana Price: केळीची कमी दराने खरेदी, चार महिन्यांत एकही कारवाई नाही.केळीची आवक मागील महिन्याच्या मध्यात प्रतिदिन सरासरी २४० ट्रक एवढी होती. त्यात हळूहळू घट झाली आहे. केळी आवकेत आणखी घट होणार आहे. जिल्ह्यात सध्या चोपडा, जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जळगाव, यावल या भागांत केळीची आवक अधिक आहे. तर रावेर, मुक्ताईनगर भागात आवक कमी आहे. धुळे व नंदुरबारातही आवक अल्प आहे..केळी खानदेशची दर मध्य प्रदेशचेमध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील दरांनुसार देशभरात केळीची खरेदी केली जात आहे. खानदेशातही केळीची शिवार खरेदी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही केळी दरानुसार मागील तीन ते चार वर्षे केली जात आहे. सध्या बऱ्हाणपुरात कमाल ६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर आहेत. तेथील दरांची सबब देवून खरेदीदार खानदेशात सरसकट ५०० ते ६०० रुपये दरात केळीची मागणी करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.