Khandesh Banana Market: खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी निर्यातीला गती मिळत नसल्याचे चित्र आहे. देशांतर्गत बाजारात केळीची आवक वाढत असली तरी केळी दरांवरील दबाव सतत वाढत असून, खानदेशात केळीला किमान ३०० व कमाल ६०० ते ६५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. .बाजारपेठेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चच्या मध्यात केळी निर्यातीच्या कार्यवाहीसाठी काही बड्या कंपन्या खानदेशात यायच्या. शेतात ‘फील्ड पॅकींग’ करून हे कंटेनर मुंबई येथे पाठविले जात होते..Banana Market: खानदेशात केळी आवकेत वाढ.तिथून त्यांची देशोदेशी निर्यात व्हायची. यातही सर्वाधिक वाटा आखाती देशांचा होता. पण, पश्चिम आशियात छेडल्या गेलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये अस्थितरतेचे वातावरण आहे. तर युरोप, रशियाच्या आघाडीवर केळी निर्यातीबाबत सामसूम आहे..Banana Market: खानदेशात केळीच्या आवकवाढीस सुरुवात.यामुळे केळीला नवी बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, देशातच केळीची विक्री करण्याची वेळ उत्पादकांवर ओढवली आहे. यात केळीची आवकही मागील १० ते १२ दिवसांत सतत वाढत चालली आहे..त्यामुळे केळी दरांवरील दबाव वाढला आहे. यंदा खानदेशातून सुमारे दोन हजार कंटेनर मार्च ते जून या कालावधीत आखातात निर्यात होणे अपेक्षित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.