Jalgaon News: केळी दरावर यंदा सणासुदीच्या कालावधीत आणि नंतर असा साडेचार महिने मोठा दबाव होता. केळी उत्पादकांना तोटा सहन करावा लागला. पण मागील तीन - चार दिवसांत केळी दरात सुधारणांचा कल दिसत असून, अनेक दिवसांनंतर काश्मिरात पाठवणुकीच्या दर्जेदार (नॉन चिलिंग) केळीचे दर २००० रुपये प्रति क्विंटल असे झाले आहेत. .केळीचा मोठा तुटवडा खानदेशात आहे. राज्यात सध्या सोलापुरात केळीची बऱ्यापैकी आवक आहे. तेथे १०० ट्रकपेक्षा अधिक (एक ट्रक १२ ते १६ टन क्षमता) केळीची आवक असून तेथून रोज ४० ते ४२ कंटेनर केळीची आखातात निर्यात होत आहे. यामुळे राज्यात देशांतर्गत बाजारात पाठवणुकीसाठी हवी तेवढी केळी नाही..Banana Farming: खानदेशात कांदेबाग केळी लागवड पूर्ण.निर्यातीसही गती आल्याने बाजारात पोकळी तयार होत असून, काश्मीर, पंजाब, हरियाना, दिल्लीच्या बाजारात केळीचा तुटवडा आहे. कमी दर्जाच्या केळीचे दर खानदेशात ५०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. मध्यंतरी कमी दर्जाच्या केळीचे दर २००, ३०० ते ४५० रुपये प्रति क्विंटल होते..Banana Farmers: खानदेशात डिसेंबर, जानेवारीत केळी लागवड अल्प राहणार.खानदेशात अल्प आवकखानदेशात सध्या रोज ३० ते ३५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. यात दर्जेदार केळी आहे. या केळीची पाठवणूक राजस्थान, दिल्ली, पंजाब, काश्मिरात केली जात आहे. जेवढे दर आखातात पाठवणुकीच्या केळीस आहेत, त्यापेक्षा अधिकचे दर काश्मिरात पाठवणुकीच्या केळीस खानदेशात मिळत आहेत. पण केळी कमी असल्याने अल्प केळी उत्पादकांना या दरांचा लाभ होत आहे. पण केळी दरांवरील दबाव दूर होत असल्याने केळी उत्पादकांना तेवढा दिलासा मिळाला आहे. .बऱ्हाणपुरातील कमाल दरही ८५० रुपयांवरमध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरात सुमारे चार महिने म्हणजेच जुलैच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत केळीचे कमाल दर ८५० रुपयांवर पोहोचले नव्हते. पण मागील दोन दिवसांत तेथे केळीचे कमाल (सर्वोच्च) दर ८५१ रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले. तर किमान दरही ३५१ रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. बऱ्हाणपुरात रोज फक्त २८ ते २९ ट्रक (एक ट्रक आठ ते १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. तेथे केळीची आवक नीचांकी स्थितीत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.