Akola News: गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली केळीच्या दरातील घसरण आता अधिक तीव्र झाली आहे. सध्या बाजारात केळीचा दर या भागात केवळ १५० ते ३०० रुपयांदरम्यान पोहोचला असून, शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी व्यापाऱ्यांकडे विनवणी करावी लागण्याची वेळ आली आहे. दरम्यान, थंडीचा जोर वाढल्याने ग्राहकांची मागणी घटली असून त्याचा थेट परिणाम केळीच्या दरावर झाल्याचा दावा खरेदीदार करीत आहेत..मागील दोन-तीन हंगामात केळीला चांगले भाव मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी या पिकाच्या लागवडीला पसंती दिली. नियमित उत्पादकांसोबतच नवीन शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर लागवड वाढवली. परिणामी हजारो एकरांमध्ये केळीचे पीक झाले. यामुळे बाजारात पुरवठा वाढला..Banana Management: थंडीमध्ये केळी बागेची काळजी कशी घ्यावी?.दरम्यान, गेल्या काळात उत्तरेकडील राज्यांतील पूरस्थितीमुळे वाहतूक आणि निर्यातीवर परिणाम झाला होता. तेव्हापासून केळीचे दर सावरण्याऐवजी सतत खालीच जात आहेत. सध्या केळीचा कमाल दर ३०० रुपये, तर किमान १५० रुपये इतका असून यातून उत्पादन खर्चदेखील वसूल होत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे..सध्या केळीचा माल मर्यादित प्रमाणात बाजारात येत असला, तरी ग्राहकांकडून मागणी कमी असल्याने विक्री ठप्प झाली आहे. पुढील काही दिवसात कलिंगड हंगाम सुरू झाल्यानंतर केळीच्या दरात आणखी घसरण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा निर्माण झाली आहे. सततच्या दर कपातीमुळे उत्पादन खर्च, वाहतूक व मजुरीही निघणे अवघड झालेले आहे. मागणीपेक्षा उत्पादन जास्त आणि थंडीमुळे खप घटल्याने बाजारातील असमतोल वाढला आहे..केळी जागेवरच पिकू लागलीबाजारात दर नाहीत, व्यापारी माल तोडायला उशीर करीत आहेत. अशा स्थितीत अनेकांच्या बागांत केळीचे घड जागेवरच पिकू लागले आहेत. पिकलेले घड व्यापारी कापत नाहीत. हेही दुसरे नुकसान होत आहे. एकूण सध्याचे चित्र केळी उत्पादकांसाठी समाधानकारक नाही, असे केळी उत्पादक शेतकरी अनिल पाटील म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.