Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात केळीचे दर प्रति क्विंटल ३०० ते ८०० रुपयांपर्यंत गडगडले आहेत. स्थानिक व्यापारी दर पाडून खरेदी करीत आहेत. तसेच अतिवृष्टीमुळे वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत. आडवळणाच्या गावातून थेट शेतातून केळीची खरेदी ठप्प आहे. .महिनाभरात दरात क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांची घसरण झाली असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. नवरात्र सुरू असल्यामुळे केळींना मागणी असते. सध्या पिकलेल्या केळीचे दर डझनाला ६० ते ८० रुपये आहेत. परंतु अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शेतात चिखल, पाणी आहे. या स्थितीत स्थानिक व्यापारी केळी खरेदी करण्यास राजी नाहीत. .Banana Rate: केळी दरावर दबाव वाढला.पक्क्या रस्त्यावरच्या गावातील केळी खरेदी केली जात आहे. महिनाभरापूर्वी ऑगस्ट महिन्यात स्थानिक व्यापारी प्रति क्विंटल १००० ते १२०० रुपये दराने खरेदी करत होते. त्या वेळी निर्यातीच्या केळीचे दर १७०० ते २२०० रुपये होते. नवरात्रात उपवास असल्यामुळे केळींना मागणी असते. दरात तेजी असते. परंतु यंदा तुलनेने कमी मागणी आहे. खरेदीदार नसल्यामुळे केळीचे घड झाडावर पिकत आहेत. त्यामुळे केळी उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत..हिगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगाव, कुरुंदा, हट्टा, कळमनुरी तालुक्यांतील डोंगरकडा, वारंगा या मंडलातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जाते. परंतु या भागात केळी प्रक्रिया उद्योग नाहीत. कोल्ड स्टोअरेज नाहीत तसेच स्थानिक निर्यातदार नाहीत. .Banana Market: केळीच्या शिवार खरेदीत बाजार समित्यांकडून शुल्क वसुली.पावसामुळे मालाच्या दर्जावर परिणाम झाल्यामुळे निर्यातीच्या केळीचे दर देखील दोन हजार रुपयांनी कमी झाले आहे. मे महिन्यातील पूर्वमोसमी पावसामुळे केळी बागा मोडून पडल्या होत्या. त्यात सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे केळी उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे..आमच्या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा पक्क्या रस्त्यावर नाहीत. त्यामुळे शेतामधून व्यापारी खरेदी करत नसल्याने शेतकऱ्यांना केळीचे घड जनावरांचे खाद्य म्हणून द्यावे लागत आहे. चांगल्या केळीची देखील दर पाडून खरेदी केली जात आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत स्थानिक मार्केटमध्ये सातशे ते आठशे रुपयांचा तर निर्यातीच्या केळीचा दोन हजार रुपये फरक आहे.- उद्धवराव देशमुख, केळी उत्पादक, हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.