Jalgaon News: खानदेशात केळीदरावर मागील चार महिन्यांपासून सतत दबाव वाढला आहे. आवकेत मोठी वाढ नसतानाही दर कमी किंवा नीचांकी स्थितीत असून, अनेक वर्षानंतर किंवा दोन-एक दशकानंतर सरासरी दर ४०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे. .मागील हंगामात गणेशोत्सव ते नवरात्रीच्या कालावधीत केळीचा सरासरी दर १८०० रुपये प्रतिक्विंटल, असा होता. पण यंदा या कालावधीत सरासरी दर ४०० रुपये प्रतिक्विंटल असा राहिला. मागील चार महिने किंवा जुलैच्या मध्यापासून ते आतापर्यंत किंवा नोव्हेंबरचा दुसरा पंधरवडा सुरू होऊनही दर ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल असेच आहेत..Soybean Market News : सोयाबीन हमीभाव केंद्रांच्या हालचाली कासवगतीने.आवकेत सतत घटकेळी आवकेत खानदेशात मागील दोन महिने सतत घट झाली आहे. जुलैच्या मध्यात खानदेशात प्रतिदिन ३२० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होती. सप्टेंबरपासून केळी आवकेत सतत घट झाली आहे. सध्या खानदेशात प्रतिदिन सरासरी १५० ते १६० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) आवक होत आहे. असे असतानाही दर मात्र कमी झाले आहेत. सध्या खानदेशात खरेदी प्रतिक्विंटल २००, २५०, ३०० ते ४०० रुपये दराने केली जात आहे..अर्ध्याहून अधिक खरेदी बऱ्हाणपूर दरांनुसारराज्यात केळीचे दर जाहीर करणारी कोणतीही मजबूत शासकीय यंत्रणा किंवा बाजार समिती नाही. कारण केळीची कमाल खरेदी शिवारात किंवा थेट केली जाते. बाजार समित्या केळी खरेदीवर शुल्क आकारत आहेत. पण शिवार खरेदीत केळीला काय दर मिळतात, शेतकऱ्याला पक्की पावती, परतावा दिला का, याची कोणतीही चौकशी करीत नाहीत. राज्यातील केळीखालील ६० ते ६५ टक्के क्षेत्र खानदेशात आहे..Banana Market News : आंध्र प्रदेशातील कमी आवकेने खानदेशच्या केळीला उठाव कायम.खानदेशसह नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलडाणा आदी भागात केळी खरेदी करताना मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीत जे केळी दर लिलावात जाहीर होतात, त्यानुसार केली जात आहे. मध्य प्रदेशात केळी दर जाहीर करताना कुठलीही पारदर्शकता, वस्तुस्थिती लक्षात घेतली जात नाही. तेथे खरेदीदार, व्यापारी, मध्यस्थ यांची लॉबी सक्रिय आहे. केळीला शासनाकडून मध्य प्रदेश किंवा राज्यात हमीभाव नाही..मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांची लॉबी खानदेशातील मध्यस्थ, एजंट यांच्याशी सतत संपर्कात असते. बऱ्हाणपूर व बडवानी जिल्ह्यात केळी हे मुख्य पीक आहे. तेदेखील खानदेशातील क्षेत्रापेक्षा कमी आहे. तेथील जमीन काळी कसदार व काही भागात मध्यम आहे. तेथील भौगोलिक स्थिती, केळीचा दर्जा राज्यातील केळी व केळीखालील क्षेत्रासारखा नाही, पण राज्यात केळीची खरेदी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजार समितीमधील दरांनुसार का केली जाते, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत..बऱ्हाणपुरातही आवक अल्पमध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही केळीची आवक घटली आहे. तेथे रोज ५० ते ५५ ट्रक (एक ट्रक चार ते १० टन क्षमता) केळीची आवक होत आहे. तेथे अनेक दिवसांपासून केळीचा किमान दर ३०० व कमाल दर ४०० ते ५०० रुपये असा जाहीर होत आहे. याच दरानुसार खानदेश व अन्य भागात केळीची खरेदी व्यापारी लॉबी करीत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.