Jalgaon News: खानदेशात केळीची शिवार खरेदी नीचांकी म्हणजेच ३०० ते ४०० व कमाल ७०० रुपये प्रतिक्विंटल या दरात सुरू आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे कुठलेही लक्ष नसून खरेदीदार लूट करीत आहेत. शेतकऱ्यांना मोठा तोटा येत असून, व्यापारी लॉबीने दर पाडून आपले खिसे भरण्याचा प्रकार राजरोस सुरू केल्यासंबंधी शेतकऱ्यांत संताप आहे. .केळीची शिवार खरेदी ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल या दरात केली जात आहे. पण सणासुदीमुळे केळीस उठाव आहे. पिकविलेल्या केळीची जळगाव, नंदुरबार, धुळे यासह अन्य तालुक्यांतील बाजारात विक्रेते २५ ते ३० रुपये प्रतिकिलो या दरात विक्री करीत आहेत. ज्या वेळेस केळीची शिवार खरेदी २००० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल या दरात सुरू होती, त्या वेळेसही केळीची किरकोळ बाजारातील विक्री २५ ते ३५ रुपये प्रतिकिलो या दरात केली जात होती..Banana Price: कमी दरामुळे केळी खरेदीचा प्रश्न गंभीर.सध्या दर कमी असतानाही किरकोळ बाजारात केळीचे दर कमी झालेले नसल्याने मध्यस्थ, खरेदीदार मोठी लूट करीत असल्याचेही दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने किरकोळ विक्रेते, मध्यस्थ, खरेदीदार यांच्या आस्थापने, खरेदीसंबंधीची झाडाझडती करावी, केळी दरांसंबंधी नियंत्रण आणावे व शेतकऱ्यांना रास्त दर मिळवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे..सध्या खानदेशात केळीची आवक जळगाव जिल्ह्यात अधिक आहे. जळगावातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जळगाव, चोपडा, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा भागात केळीची आवक होत आहे. प्रतिदिन २८० ते २८५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक आहे. दर्जेदार केळी खानदेशात आहे. पण दर कमी आहे. रास्त दरासंबंधी प्रशासनही हस्तक्षेप करीत नसल्याने शेतकऱ्यांत संताप आहे..Banana Export: वसमतमधून १२ टन केळी निर्यात.बऱ्हाणपुरातील केळी दरानुसार खरेदी बंद कराजगात किंवा देशात केळी उत्पादनात जळगाव जिल्हा आघाडीवर, अग्रेसर आहे. पण केळीचे जाहीर लिलाव जिल्ह्यात होत नाहीत. केळीची पणन व्यवस्था मजबूत नाही व त्यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. पूर्वी रावेरातील केळीचे मोठे खरेदीदार, व्यापारी केळी दर जाहीर करायचे. त्यानुसार केळीची खरेदी खानदेशात केली जात होती. पण अलीकडे किंवा मागील दोन ते अडीच वर्षांपासून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजार समितीत केळीला जे दर लिलावात मिळतात, त्याच किंवा त्यापेक्षा कमी दरात खानदेशात केळीची शिवार खरेदी केली जात आहे..बऱ्हाणपुरात सध्या केळी दर ३०० ते ७०० व कमाल १३०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. तेथे केळीची आवक सध्या २८० ट्रक (एक ट्रक चार ते १६ टन क्षमता) एवढी आहे. जळगावमध्ये बऱ्हाणपूरच्या तुलनेत दर्जेदार केळी असते. यामुळे बऱ्हाणपुरातील दरात जळगावात खरेदी बंद करावी, व्यापारी, खरेदीदार यांना त्यासंबंधी तंबी दिली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.