Akola News: गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत केळीच्या दरांवरील दबाव सलग वाढत असून, भावात मोठी घसरण झाली आहे. सध्या उच्च दर्जाच्या केळीला प्रति क्विंटल केवळ ८५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे, तर दुय्यम प्रतीच्या मालाची अवस्था अत्यंत बिकट असून त्याला अवघ्या ३०० ते ४५० रुपयांच्या दरम्यान मागणी होत आहे. बाजारपेठेत सध्या मालाचा उठाव कमी असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी दरात मोठी कपात केली आहे..केळीच्या दरात होत असलेल्या या घसरणीचे मुख्य कारण जागतिक घडामोडींमध्ये दडले आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून केळीची निर्यात विस्कळीत झाली आहे..Banana Cultivation: उष्णतेमुळे केळी लागवड रखडली.भारताच्या केळीला आखाती देशांत मोठी मागणी असते, मात्र निर्यातीचा हा मार्ग खुंटल्याने त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला आहे. मागील महिन्यात १००० रुपयांच्या आसपास असलेले दर युद्ध सुरू झाल्यानंतर सातत्याने घसरत खाली आले आहेत..Banana Crop Care : उन्हाळ्यात केळी बागेचे नुकसान टाळण्यासाठी ५ उपाय!.उन्हाचा दर्जावर परिणामया भागात वाढत्या उन्हाची तीव्रता ही शेतकऱ्यांसाठी दुसरी डोकेदुखी ठरत आहे. उन्हामुळे केळीच्या दर्जावर परिणाम होत असून, दुय्यम प्रतीच्या मालाचे प्रमाण वाढले आहे. या दुय्यम मालाला व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे..नवीन लागवड अडचणीतनवीन लागवडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. गेल्या काळात मिळालेल्या चांगल्या दरांमुळे आणि टिश्यू कल्चर रोपांच्या उपलब्धतेमुळे या वर्षीही केळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसतो. नामांकित कंपन्यांच्या रोपांचे बुकिंग पूर्ण झाले असून पुरवठ्यासाठी मोठी ‘वेटिंग’ आहे. मात्र, एकीकडे रोपांचे वाढलेले दर आणि व्यवस्थापनाचा ‘अव्वाच्या सव्वा’ खर्च, तर दुसरीकडे दरातील ही अनिश्चितता यामुळे नवीन लागवड करू इच्छिणारे शेतकरी सध्या मोठ्या चिंतेत सापडले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.