Akola News: काही महिन्यांपासून सतत घसरत असलेले केळीचे दर आता पुन्हा वाढीच्या दिशेने सरकत असल्याचे दिसून येते. मालाची उपलब्धता घटल्याने अकोला बाजारात तेजी दिसत असून उच्च दर्जाच्या केळीला ९०० ते १००० रुपये दर मिळू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मिळणारे अत्यल्प दर शेतकऱ्यांसाठी मोठी चिंता ठरले होते..मागील आठवडाभरात केळीच्या बाजारभावात सातत्याने सुधारणा दिसत आहे. सोमवारी (ता. ८) केळी बोर्डाचा दर ७५० रुपये नोंदवला गेला. सध्या माल कमी आणि मागणी स्थिर असल्याने दरात सुधारणा दिसून येत आहे. खरेदीदारांच्या मते, सध्या केळीचा दर्जा घसरत आहे आणि उपलब्धताही मर्यादित आहे. त्यामुळे येत्या काळात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..Banana Farming: केळी उत्पादकांच्या शिवारफेरीत तज्ज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन.दरम्यान, गेल्या तीन-चार महिन्यांत केळी उत्पादकांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले. दरांत झालेल्या घसरणीमुळे व्यापाऱ्यांनीही खरेदी टाळण्याचा सातत्याने कल दाखवला होता. परिणामी, अनेक शेतकऱ्यांचे केळी घड झाडावरच पिकून खराब होताना दिसले. काही ठिकाणी तर कमी दरामुळे उत्पादन खर्चही न निघाल्याने ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली होती..आता मात्र बहुतांश शेतकऱ्यांचा माल बाजारात विक्री झालेला असल्याने व उपलब्धता कमी झाल्याचा परिणाम थेट भावांवर दिसू लागला आहे. हंगाम अखेराकडे जात असताना उरलेल्या मालाला मागणी वाढत असून काही प्रमाणात दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. सध्या ज्यांच्या बागांमध्ये चांगल्या प्रतीची केळी उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांना या दरवाढीचा थोडाफार फायदा होणार आहे..Banana Prices: दर घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत.तथापि, मागील काही महिन्यांत झालेल्या तोट्याची भरपाई होण्यासाठी आणखी काही काळ दर उच्च पातळीवर राहणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. बाजारातील सध्याची तेजी अशीच टिकून राहिल्यास येत्या पंधरवड्यात केळीच्या दरात आणखी सुधारणा दिसू शकते, अशी अपेक्षा केळी उत्पादक व्यक्त करीत आहेत..सध्या बोर्डाचा दर ७०० ते ७५० असून केळीची खरेदी या दरापेक्षा २०० रुपये अधिक देत व्यापारी ऑनने माल नेत आहेत. केळी उत्पादकांसाठी ही बाब चांगली असली तरी माल कमी असल्याने तितकासा फायदा झालेला नाही. येत्या काळात सणासुदीत दर आणखी वाढतील असे दिसून येते.सचिन कोरडे, केळी उत्पादक तथा राष्ट्रीय समन्वयक, बनाना महासंघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.