Jalgaon News: केळी निर्यातीत देशातून यंदा काहीशी वाढ झालेली दिसून येत आहे. आयातदारांकडून किंवा आखातातून अलीकडे मागणी कमी झाल्याने राज्यातील केळी निर्यात मागील महिनाभरापासून कमी झाली आहे. .एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत देशातून सुमारे २७ हजार कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात झाली आहे. २०२३-२४ च्या तुलनेत ही निर्यात अधिक आहे. असे जरी असले तरी गेल्या महिनाभरापासून केळी निर्यात कमी असल्याची माहिती मिळाली..Banana Rate: केळीचा दर घसरला; उत्पादकांची चिंता वाढली.इस्राईल व आखातात तणाव असल्याने निर्यातीसंबंधी मागील हंगामात अडचणी होत्या. यंदा वाहतुकीसंबंधी अडथळे कमी असून, आखातातील तणाव कमी होत आहे. तर इराण, इराकमध्ये पाकिस्तानची केळी सप्टेंबरपासून पोचू लागली आहे..पाकिस्तानची केळी भारतीय केळीच्या तुलनेत कमी दर्जाची आहे. परंतू वाहतूक खर्च कमी लागत असल्याने इराण, इराकचे खरेदीदार पाकिस्तानी केळीस पसंती देत आहेत. तसेच केळी निर्यातीसाठी यापुढे युरोप, रशियाचा पर्यायही आवश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे..Banana Arrivals: खानदेशात केळी आवकेत मोठी घट.दर ऑक्टोबरमध्ये घसरलेएप्रिल ते जून २०२५ या कालावधीत निर्यातीच्या केळीचे दर स्थिर होते. परदेशासह देशांतर्गत निर्यातीसाठी मिळून खानदेशात रोज ६०० ट्रक केळी काढणीसाठी एप्रिल व मे महिन्यात उपलब्ध होती..पण दर टिकून होते. कारण निर्यातीला गती होती. कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर निर्यातीच्या केळीस या कालावधीत मिळाला. परंतु केळी आवकेत जुलैत वाढ सुरू झाली. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये निर्यातीच्या केळीचे दर १६०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. पण ऑक्टोबरच्या मध्यानंतर निर्यातीच्या केळीचे दर १४०० रुपये झाले. आता १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर निर्यातीच्या केळीस आहे..महाराष्ट्राची कामगिरी चांगलीकेळी निर्यातीत महाराष्ट्र पुढे आहे. देशातील एकूण केळी निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ६३ टक्क्यांपर्यंत दिसत आहे. या पाठोपाठ गुजरात, आंध्र प्रदेश व केरळ येथून केळी निर्यात होत आहे. देशात आता बारमाही केळी निर्यातीसाठी उपलब्ध आहे. राज्यात केळी लागवडीत जळगाव पुढे आहे. निर्यातीत सोलापुरने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे..खानदेशातून निर्यात सुरूचगेल्या उन्हाळ्यात खानदेशात केळी अधिकची उपलब्ध झाली. रोज १०० ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) केळी मार्च ते मे या कालावधीत खानदेशात निर्यातीसाठी उपलब्ध झाली. अजूनही खानदेशात जामनेर (जि.जळगाव) येथून केळीची निर्यात सुरू आहे. रोज सात ते आठ कंटेनर केळीची निर्यात खानदेशातून आखातात केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.