Market Update: खानदेशात केळीची आवक वाढली असून सध्या ती प्रतिदिन १९५ ट्रकपेक्षा (एक ट्रक ः १६ टन क्षमता) अधिक आहे. मागील महिन्यात केळी आवक प्रतिदिन सरासरी १६५ ट्रक एवढी होती, अशी माहिती बाजारपेठेतील सूत्रांनी दिली..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या रावेर तालुक्यातील केळी आवक प्रतिदिन ७५ ते ८० ट्रक एवढी आहे. रावेरपाठोपाठ मुक्ताईनगर, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागांतून केळी आवक होत असून, ही आवक पुढील दोन ते तीन दिवसांत प्रतिदिन सरासरी २०० ट्रकपेक्षा अधिक होईल..Banana Market: खानदेशात केळीच्या आवकवाढीस सुरुवात.तसेच, मध्य प्रदेश, गुजरात व आंध्र प्रदेशातही केळीची आवक सुरू आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे केळी निर्यातीत अडथळे येत असल्याने देशांतर्गत बाजारांत केळी पाठवावी लागत आहे. यामुळे केळी दरांवर दबाव वाढत आहे..Akola Banana Market: अकोल्यात केळी बाजारात तेजी.केळीला उत्तर भारतात मागणी आहे. परंतु, आवकही अधिक असल्याने दरदेखील सतत कमी होत चालले आहेत. काश्मिरात पाठवणुकीच्या केळीला सर्वाधिक ११०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिकचा दर आहे. खानदेशात केळीला ४००, ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. काही भागात यापेक्षा कमी दरात केळीची खरेदी केल्याचे प्रकारही झाल्याची माहिती मिळाली आहे..रावेर, शिरपूर भागात पिलबाग केळीची काढणी पूर्ण होत आली आहे. दर्जेदार मृग बहराची केळी किंवा मागील वर्षी मे, जूनमध्ये लागवड झालेल्या बागांतून केळीची आवक होत आहे. ही आवक रावेर व नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात अधिक आहे..निर्यात ठप्प झाल्याने अडचणकेळीची परदेशातील निर्यात सध्या कमी आहे. परदेशात निर्यात होणाऱ्या व उत्तर भारतात मागणी असलेल्या केळीचे दर एकसारखेच आहेत. यामुळे खानदेशातून निर्यातीच्या आघाडीवर सामसूम असल्याचे चित्र आहे. इराण आणि अमेरिका, इस्त्रायलमध्ये महिनाभरापासून छेडल्या गेलेल्या युद्धामुळे आखातातील केळीची पाठवणूक ठप्प झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.