Beed News: बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रेशीम कोष बाजारपेठेमध्ये १६ ते २३ डिसेंबर दरम्यान सुमारे २८७ क्विंटल रेशीम कोषाची आवक झाली. या कोषाला सरासरी ६४९ ते ६९३ रुपये प्रति किलो दरम्यान दर मिळाला. आठवड्याच्या शेवटी रेशीम कोष आवकेत घसरण झाल्याने दर वधारले आहे..बाजार समितीच्या माहितीनुसार, बीड रेशीम कोष खरेदी बाजार समितीमध्ये सात दिवसांत २००५ ते ५८८४ किलो दरम्यान कमी अधिक प्रमाणात रेशीम कोषांची आवक झाली. सात दिवसांत सर्वाधिक आवक २२ डिसेंबरला ५८८४ किलो ३०० ग्राम इतकी झाली. त्यादिवशी रेशीम कोषाला ३०० ते ७९५ रुपये प्रति किलो दरम्यान तर सरासरी ६७१ रुपये प्रति किलोचा दर मिळाला..Silk Farming: रेशीम शेतीतून वर्षभरात साडेचार कोटींचे उत्पादन.सर्वात कमी आवक २३ डिसेंबरला २००५ किलो ४५० ग्रॅम इतकी झाली. या दिवशी रेशीम कोषाला ५२५ ते ७७५ रुपये प्रति किलो दरम्यान तर सरासरी ६७५ रुपये प्रति किलोचा दर मिळाला. सरासरी दर १६ डिसेंबरला सर्वाधिक ६९३ रुपये प्रति किलो तर २० डिसेंबरला सर्वात कमी ६४९ रुपये प्रति किलो राहिला..बाजार समितीमध्ये रेशीम कोशाची होणारी आवक लक्षात घेता बाजार समितीमधील दोन शेड रेशीम कोष खरेदीसाठी राखून ठेवण्यात आले आहे. शिवाय दीड तासाला ५०० किलो रेशीम कोष ड्राय करण्याची क्षमता असलेले ड्रायरही बाजार समितीकडे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आल्याचे बाजार समितीकडून कळविण्यात आले..Silk Cocoon Market: बीडच्या बाजारपेठेत रेशीम कोषांच्या किमान दरात वाढ.३० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांचा सहभागरेशीम कोष खरेदीसाठी बीड बाजार समितीमध्ये रामनगर पश्चिम बंगाल कर्नाटका व स्थानिक मिळून सुमारे ३० ते ४० व्यापारी दररोजच्या खरेदीत सहभाग घेतात. बाजार समितीच्या माहितीनुसार, रेशीम कोष खरेदीसाठी सुमारे दीडशे व्यापाऱ्यांनी आजवर नोंदणी केली आहे. बीड जिल्ह्यासह जालना, परभणी, नाशिक, पुणे आदी जिल्ह्यांतून सातत्याने बीड बाजारपेठेत रेशीम कोषाची आवक होते आहे..तारीख..... आवक.......... दर रुपयांत (प्रति किलो)१६....४४७८ किलो ९०० ग्रॅम... ४९० ते ७८५१७... ४४५२किलो २०० ग्रॅम.... ४१५ ते ७८५१८... ५०२०किलो २०० ग्रॅम.... ३५५ ते ७४०१९....४०४२ किलो १००ग्रॅम....३०० ते ७५५२०... २८६७ किलो ३०० ग्रॅम...३३० ते७५५२२....५८८४ किलो ३०० ग्रॅम....३०० ते ७९५२३... २००५ किलो ४५० ग्रॅम....५२५ ते ७७५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.