Unapproved Herbicide Sales on E-Commerce Websites: केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) ‘सायक्लोसिनोन हर्बिसाइड’ या कथित अप्रमाणित तणनाशकाच्या विक्रीवरून ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो आणि जिओमार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस पाठविली आहे. .या नोटिशीनंतर चारही मोठ्या कंपन्यांनी ‘सायक्लोसिनोन हर्बिसाइड’ची विक्री थांबवली असून, प्राधिकरणाकडून या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.प्राधिकरणाने शनिवारी (ता.१६) जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की संबंधित उत्पादनांची सर्व माहिती तत्काळ हटविण्यात आली आहे..Fake Fertilizers Seeds Issue: बोगस बियाणे, खत काळाबाजार प्रकरणांत थेट गुन्हे दाखल करा : विखे पाटील.तसेच हे उत्पादन विकणाऱ्या विक्रेत्यांच्या खात्यांचीही चौकशी सुरू आहे. मात्र केवळ उत्पादन हटवणे पुरेसे नसून, संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली जाणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले. नुकतीच कृषी मंत्रालयामार्फत क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडियाने याबाबत तक्रारी केली होती. त्यानुसार ‘सायक्लोसिनोन हर्बिसाइड’ हे उत्पादन कीटकनाशक कायदा १९६८ अंतर्गत मंजूर यादीत नसतानाही त्याची ऑनलाइन विक्री आणि जाहिरात केली जात होती. .तसेच उत्पादनामधील सक्रिय रसायन, त्याची नेमकी रासायनिक ओळख, वैध परवाना क्रमांक, परवान्याची मुदत आणि धोकादायक आवश्यक इशारे यांचा अभाव असल्याचे निर्दशनास आणून दिले होते. प्राधिकरणाच्या मते, उत्पादनावरील अपुरी माहिती ग्राहकांची दिशाभूल करू शकते. विशेषतः शेतकरी उत्पादनांवर विश्वास ठेवून वापर करत असल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धोका ठरू शकतो..Cyclosinone Herbicide : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो आणि जिओमार्टला नोटीस; अप्रमाणित तणनाशक विक्रीचं प्रकरण.तसेच इन्सेक्टिसाइड्स (सेकंड अमेंडमेंट) रूल्स, २०२२ चा उल्लेख करत प्राधिकरणाने सांगितले, की कोणतेही कीटकनाशक ऑनलाइन विक्रीस ठेवण्यापूर्वी ई-कॉमर्स कंपन्यांनी विक्रेत्याचा परवाना तपासणे बंधनकारक आहे. जर योग्य पडताळणी न करता उत्पादने विकली गेली, तर ते ग्राहक संरक्षण कायदा २०१९ आणि ई-कॉमर्स नियम २०२० चे उल्लंघन मानले जाऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे..संबंधित कंपन्यांकडून जानेवारी २०२४ पासून किती माहिती देण्यात आली, संबंधित विक्रेत्यांची संपूर्ण माहिती आणि नियमांचे पालन कसे केले जात होते का, याबाबत तपशीलही केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने मागवला आहे..डिजिटल सुविधा महत्त्वाची असली तरी ग्राहकांची सुरक्षा, कायद्यांचे पालन आणि सार्वजनिक हित यांच्याशी तडजोड करता येणार नाही, असे प्राधिकरणाने नमूद केले आहे. तसेच शेती, आरोग्य आणि सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित उत्पादनांच्या विक्रीत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि गैरप्रकारांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.