कापसातील तेजी कायम राहण्याचा अंदाज

फ्युचर्स किमतीः सप्ताह- २२ ते २९ एप्रिल, २०२२
Cotton Rate
Cotton Rate Agrowon

मार्च महिन्यात कापूस (Cotton Rate), मका, मूग, सोयाबीन व टोमॅटो यांच्या किमती वाढत होत्या. हळद, तूर व कांदा यांच्या किमतींत उतरता कल होता. हरभऱ्याच्या किमतीत चढ-उतार होत होते.

भारतातील मक्याची आवक (Maize Arrival) एप्रिल सुरुवातीपासून वाढत आहे. सध्या ती दर आठवड्याला ७० ते ७५ हजार टन इतकी आहे. हळदीची आवक मार्च अखेर पर्यंत वाढत होती; आता ती कमी होत आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून बाजार समितीतील हरभऱ्याची आवक (Chana Arrival) सतत वाढत असून सध्या ती (दर आठवड्यात) दीड लाख टनाच्या आसपास आहे. सोयाबीन व तूर यांची आवक कमी होत आहे. कांद्याची आवक ३ ते ४ लाख टन तर टोमॅटोची आवक ४० ते ७० हजार टन आहे.

कापसाची आवक (Cotton Arrival) कमी होत आहे. मुगाची आवक पण घटली असून ती सध्या पाच हजार टनाच्या आसपास आहे. या सप्ताहात कापूस, तूर व कांदा यांच्या किमती वाढल्या. २ मे पासून NCDEX मध्ये बाजरी, मका व हळद यांचे सप्टेंबर फ्युचर्स साठी तर MCX मध्ये कापसासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर फ्युचर्स साठी व्यवहार सुरु होतील.

सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे व कपाशीचे (Cotton Spot Rate) राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) मार्च महिन्यात वाढत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव १.३ टक्क्याने वाढून रु. ४५,१८० वर आले. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव पुन्हा १.७ टक्क्याने वाढून रु. ४५,९४० वर आले आहेत. मे डिलिवरी भाव ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ४५,७१० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव १.३ टक्क्यांनी वाढून रु २,२८२ वर आले आहेत. कापसातील तेजी कायम राहील.

मका
मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या. या सप्ताहात त्या ६.५ टक्क्यांनी घसरून रु. २,१५९ वर आल्या आहेत. फ्युचर्स (मे डिलिवरी) किमती रु. २,१६५ वर आल्या आहेत. जुलै फ्युचर्स किमती रु. २,००८ वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,८७० आहे. रबी मका आता बाजारात येऊ लागला आहे. मक्याची मागणी वाढती राहणार आहे. मक्याचा इथेनॉलसाठी वाढता वापर, युक्रेन युद्ध व खताच्या वाढत्या किमती यामुळे मक्याच्या जागतिक किमतीसुद्धा वाढत आहेत.

हळद
हळदीच्या स्पॉट (निझामाबाद) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ३.३ टक्क्यांनी घसरून रु. ८,८४७ वर आल्या आहेत. मे फ्युचर्स किमती २.७ टक्क्यांनी घसरून रु. ८,६०८ वर आल्या आहेत.

हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर)किमती मार्चमध्ये चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी घसरून रु. ४,९२२ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,२३० आहे. आवक वाढत आहे.

मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ७,०५० होती. या सप्ताहात ती ६,९०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,२७५ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन
सोयाबीनची स्पॉट किंमत (इंदूर) मार्च महिन्यात वाढत होती. गेल्या सप्ताहात ती २.३ टक्क्याने घसरून रु. ७,७७१ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा १.६ टक्क्यांनी घसरून रु. ७,६४८ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु.३,९५० आहे.

तूर
तुरीची स्पॉट किंमत (अकोला) मार्च महिन्यात कमी होत होती. गेल्या सप्ताहात ती २.६ टक्क्यांनी घसरून रु. ६,००० वर आली होती. या सप्ताहात ती १.४ टक्क्यांनी वाढून रु. ६,०८३ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,३०० आहे. तुरीची आवक कमी होऊ लागली आहे.

कांदा
कांद्याची स्पॉट किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. ८५५ होती; या सप्ताहात ती रु. ८८९ वर आली आहे. रबी कांद्याची आवक आता वाढू लागली आहे.

टोमॅटो
टोमॅटोची स्पॉट किंमत (नाशिक) गेल्या सप्ताहात रु. १०५६ होती; या सप्ताहात ती रु. ८५३ वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com