उसाच्या रसापासून ‘केन जाम’ विकसित

कोइमतूरच्या ऊस पैदास केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश यांचे संशोधन
Cane Jam
Cane JamAgrowon

नाशिक : बाजारपेठेत (Market) फळांच्या गरापासून तयार केलेले जाम उपलब्ध आहे. मात्र भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोइमतूर (तमिळनाडू) येथील ऊस पैदास केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश जी. एस. यांनी उसाच्या रसाचे मूल्यवर्धन करून देशात पहिल्यांदाच ‘केन जाम’ निर्मिती केली आहे. उसाच्या रसापासून बनविलेले या प्रकारचे हे पहिले नावीन्यपूर्ण प्रक्रियायुक्त उत्पादन ठरले असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका डॉ. जी. हेमप्रभा यांनी दिली.
फळांचे गर आणि साखर (Sugar) यांचे समप्रमाणात मिश्रण करून बाजारात विविध प्रकारच्या व चवीचे जाम उपलब्ध आहेत. मात्र या उत्पादनात उसाच्या (Sugarcane) रसाचा पूर्णपणे वापर करून साखर न मिसळता हे उत्पादन विकसित केले आहे. तंत्रज्ञानाचे विकासक डॉ. सुरेश यांनी सांगितले की, उसापासून तयार करण्यात आलेल्या जाममध्ये जीवनसत्त्वे व्यतिरिक्त पोटॅशिअम, सोडिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम (Potassium, Sodium, Magnesium and Calcium) यांसारख्या खनिजे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. जाम उत्पादनाच्या उद्देशाने गाळप केलेल्या एका टन उसापासून (One Tan Sugarcane) ऊस उत्पादकांना सुमारे २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा दावा त्यांनी केला आहे.

Cane Jam
उसापासून साखर निर्मितीची प्रक्रिया 

ऊस पैदास संस्थेच्या संचालक डॉ. जी. हेमाप्रभा यांनी सांगितले, ‘केन जाम’ उसाच्या रसापासून बनवलेले नावीन्यपूर्ण उत्पादन आहे. ज्यामध्ये उसाच्या (Sugarcane) रसाची पौष्टिकता आणि चव टिकवून ठेवली आहे. यामध्ये फळांच्या विविध चवींचे घटक मिसळता येतात. त्यामुळे विविध चवीचे जाम निर्मिती करणे सहज शक्य आहे. हे उत्पादन विकसित करताना अननस, चेरी, चॉकलेट, आले-लिंबू, आले व दालचिनी या चवीचे जाम तयार करण्यात आले आहेत. हा जाम ब्रेड, चपाती, इडली, डोसा आणि केक यांसारख्या खाद्यपदार्थांसह वापरला जाऊ शकतो.

व्यवसायिक उत्पादनाचे तंत्रज्ञानाचे हस्तांतर केंद्रीय
कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नुकत्याच झालेल्या ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे विकसित उत्पादनाचे अनावरण करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान महाराष्ट्र आणि तमिळनाडू राज्यातील दोन कंपन्यांना व्यावसायिक उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचा परवाना हस्तांतरित करण्यात आला आहे. अन्नप्रक्रिया उद्योगांना व्यावसायिक उत्पादनासाठी हे तंत्रज्ञान हस्तांतरित केले जात आहे. इच्छूकांनी संस्थेच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ऊस पैदास संस्था कोइमतूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com