कृषी क्षेत्रामध्ये आर्थिक गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी शेती उत्पादनातील प्रत्येक टप्प्यावरील नेमक्या निविष्ठा आणि घटकांचा कार्यक्षम वापर होण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने नेदरलॅंड येथील वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन केंद्रामध्ये खास अर्थशास्त्रीय अभ्यास करण्यात आला. त्यात संगणकीय पद्धतीने प्रामुख्याने हरितगृह शेती आणि व्हर्टिकल फार्मिंग याविषयी निविष्ठा वापर कार्यक्षमता मिळविण्यात आली. वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची समस्या सोडविण्यासाठी पिकांची उत्पादकता वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पिकांच्या उत्पादनासाठी आवश्यक पाणी, ऊर्जा, कार्बन डायऑक्साइड, माध्यमे (माती इ.) अशा सर्व घटकांचा अत्यंत कार्यक्षम वापर होण्याची आवश्यकता आहे. त्याच प्रमाणे शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्याचीही गरज आहे. अशा वेळी नवीन गुंतवणूक होण्यासाठी प्रतिकिलो उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या आवश्यक निविष्ठा व घटकांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. कारण कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणारी व्यक्तीही उत्पादनखर्च आणि त्यातून मिळणाऱ्या फायद्याचा प्रामुख्याने विचार करते. त्यामुळे शाश्वत उत्पादन आणि आर्थिक दृष्टीने सक्षमता येण्यासही मदत होईल. अत्याधुनिक शेतीमध्ये अलीकडे गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी गुंतवणूकदारांचे प्रश्न प्रामुख्याने शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्रोतांसंबंधी असतात. यावर अधिक नेमकेपणाने काम करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन अमेरिकेतील वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन येथील हरितगृह व फळबाग विषयातील तज्ज्ञांनी अभ्यास सुरू केला. त्यांनी स्रोत व नेमके प्रमाण मिळविण्यासाठी संगणकीय प्रारूपांचा वापर केला आहे. त्याद्वारे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील आणि कोणत्याही लागवड पद्धतीतील निविष्ठा व आवश्यक घटकांचे प्रमाण मोजणे शक्य होणार आहे. याचा फायदा भविष्यामध्ये शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्यासाठी होऊ शकतो, असा संशोधकांचा दावा आहे.
अशा अभ्यासाची मोठी आवश्यकता अलीकडे अत्याधुनिक प्रामुख्याने हरितगृह आणि हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. यातून एखाद्या कंपनीप्रमाणे शाश्वत उत्पादनाची हमी मिळू शकते. मात्र, तरिही त्यात वापरल्या जाणाऱ्या विविध निविष्ठा आणि आवश्यक नैसर्गिक घटकांविषयी अनिश्चितता कायम आहे. केवळ फायदा आणि आकडेवारी समजणाऱ्या लोकांसाठी नैसर्गिक प्रक्रियेतील चढ-उतारांचाही नेमका पॅटर्न मिळण्याची अपेक्षा असते. त्यातून धोक्यांचे प्रमाण कमी करणे, शाश्वतता वाढवणे आणि फायद्यांचे प्रमाण वाढवणे शक्य आहे. ती सध्याच्या कोणत्याही कृषी अर्थशास्त्रविषयक अभ्यासातून पूर्ण होताना दिसत नाही.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.