Kolhapur News: देशात आतापर्यंत ११८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ९५ लाख टन होता. डिसेंबरअखेरपर्यंत घोडदौड कायम राखत महाराष्ट्र साखर उत्पादनात अग्रेसर राहिला आहे..या कालावधीत राज्यात ४९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३० लाख टन साखर तयार झाली होती. राज्यात डिसेंबरअखेर गेल्या वर्षीपेक्षा १९ लाख टन साखरेचे उत्पादन जादा झाले आहे..Natural Sugar AI Project: नॅचरल शुगरचा एआय प्रकल्प प्रेरणादायी: प्रतापराव पवार.अनुकूल परिस्थितीमुळे देशातील सर्वच भागात ऊसतोडणीने वेग घेतला आहे. उत्तर प्रदेशात ३५ लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षी येथे ३३ लाख टन साखर तयार झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तरप्रदेशातील उत्पादनात फारसा फरक नसल्याचे चित्र आहे. कर्नाटकातही अशीच परिस्थिती आहे. केवळ महाराष्ट्रानेच साखर उत्पादनात यंदा निर्विवाद आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे..देशाची साखर उत्पादनातील गती पाहता हंगामअखेर देशातील साखर उत्पादन ३१५ लाख टन होईल, अशी शक्यता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केली आहे. या अंदाजानुसार केंद्र सरकारची पुढील धोरणे अपेक्षित असल्याचे महासंघाच्या सूत्रांनी सांगितले..Sugar Production: राज्यात दोन महिन्यांत ४९२ लाख क्विंटल साखर उत्पादन, कोल्हापूर विभागात सर्वाधिक.दरम्यान, केंद्राने जानेवारीसाठी २२ लाख टनांचा कोटा देशातील साखर कारखान्यांना जाहीर केला आहे. देशातील सर्वांत मोठा साखर उत्पादक असलेल्या महाराष्ट्राचा कोटा डिसेंबरच्या तुलनेत ९३ हजार ५२८ टनांनी (१२.२६ टक्के) वाढवून ८ लाख ५६ हजार ५८६ टन करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचा कोटा ४९ हजार १९ टनांनी वाढून ७ लाख ०५ हजार ६१० टन झाला असून, वाढीचे प्रमाण ७.४७ टक्के आहे. बाजारातील उपलब्धता आणि विक्री क्षमतेचा विचार करून ही वाढ देण्यात आल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले..दुसरीकडे, कर्नाटकचा कोटा ७४ हजार २४९ टनांनी (१७.५२ टक्के) कमी करून ३ लाख ४९ हजार ५८८ टन करण्यात आला आहे. हरयाणाचा कोटा ४०.३८ टक्क्यांनी घटून २८ हजार ६५८ टन, तर बिहारचा कोटा तब्बल ३१ हजार ५७९ टनांनी (४८.२३ टक्के) कमी करण्यात आला आहे. तेलंगणालाही तब्बल ५१.४२ टक्के कोटा कपातीचा फटका बसला आहे..कोटा वाढविलेली अन्य राज्ये (टक्के)छत्तीसगड ५१.७६आंध्र प्रदेश १०.६४तामिळनाडू १५.५२ओडिशा ३३.७७कोटा घटविलेली राज्ये (टक्के)पंजाब १८.३१मध्य प्रदेश १३.६३गुजरात २.५७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.