Sangli News: सांगली जिल्ह्याच्या शेतीमालाने आता जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून तब्बल ६४ हजार १४६.४० टन फळे आणि भाजीपाल्याची निर्यात झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आठ हजार ३७७.९२ टनांची निर्यात वाढली आहे. जिल्ह्यातून एक लाख टन भाजीपाला आणि फळांची निर्यात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आल्याची माहिती कृषी विभागाने दिली..जिल्ह्यातून २०२३-२४ या वर्षात ११ हजार ६१७ शेतकऱ्यांनी निर्यात करण्यासाठी नोंदणी केली असून ६७३५ हेक्टरवरील द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला यासह अन्य पिकांची निर्यात केली आहे. गतवर्षी ५५ हजार ७६८.४८ टन केळी, डाळिंब, द्राक्षे, मिरची, मका, आंबा, बेबी कॉर्न, वाटाणा, हळद, भाजीपाल्याची निर्यात केली होती..Pomegranate Export : माढेश्वरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीकडून डाळिंब निर्यात .जागतिक बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्यामुळे जिल्ह्यातून निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रामुख्याने द्राक्ष निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. २०२४-२५ या वर्षात जिल्ह्यातही १३ हजार ४७५ शेतकऱ्यांनी ८०२७ हेक्टरवरील पिकांची निर्यात करण्यासाठी नोंदणी केली होती. गतवर्षी ६४ हजार १४६.४० निर्यात झाली..२०२३-२४ पेक्षा गतवर्षी आठ हजार ३७७.९२ टनांनी निर्यातीत वाढ झाली आहे. द्राक्ष, डाळिंब, केळी, मका, आंबा, मिरची आणि बेबी कॉर्न गल्फ देश, युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील बाजारपेठांमध्ये निर्यात होऊ लागली आहे. जिल्ह्यातून जवळपास एक लाख टनांनी शेतीमाल निर्यातीचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले..India Agricultural Exports : आयात शुल्कावरुन अमेरिकेला शह? शेतकरी हितासाठी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, निर्यातीसाठी आखली ‘ही’ रणनिती.जिल्ह्यातून भाजीपाला, फळांच्या निर्यातीवर दृष्टिक्षेप (टन)पीक वर्ष२०२३-२४ वर्ष२०२४-२५केळी ६० १३८२मिरची २०८ १६७डाळिंब दाणे ३८४ २३४३द्राक्ष १९२७९ १८११२मका, मका रवा ३१०५७ ३२४२६आंबा ५०४ ६९बेबी कॉर्न, वाटाणा ९५१ ४६४५तांदूळ ३०६ ४१९हळद २७३९ ३९८२भाजीपाला २ १२१इतर २८२ ४८१.शेतीमाल निर्यातीसाठी आम्ही सातत्याने प्रोत्साहन देत आहोत. यामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, मका, आंबा, मिरची आणि बेबी कॉर्नच्या निर्यातीत वाढ झाली आहे. शेतीमाल प्रक्रिया उद्योग वाढवण्यासाठीही कृषी विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्यातीला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.