आरोग्यदायी द्राक्ष

द्राक्षापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे. द्राक्षापासून रस, सरबत, वाइन, जेली, लोणची, मुरंबा, बेदाणा व मणूका तयार करतात. आरोग्याच्या दृष्टीने द्राक्षाचे अनेक फायदे आहेत.
grapes
grapes

द्राक्षापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे. द्राक्षापासून रस, सरबत, वाइन, जेली, लोणची, मुरंबा, बेदाणा व मणूका तयार करतात. आरोग्याच्या दृष्टीने द्राक्षाचे अनेक फायदे आहेत.  द्राक्ष हे अल्पकाल टिकणारे फळ आहे. काढणीनंतर फक्त पाच ते सहा दिवस ती चांगली राहतात. जगाभरातील द्राक्ष उत्पादक फक्त वाइन बनविण्यासाठी द्राक्ष उत्पादन घेतात. फारच थोड्या देशांमध्ये ताजी द्राक्ष खाण्यासाठी वाढविली जातात. द्राक्ष नाशवंत फळ असल्यामुळे  त्यांची काढणीनंतर त्वरीत विक्री करणे गरजेचे असते. विक्री करण्यास उशीर झाल्यास द्राक्ष खराब होतात. परिणामी, चांगला दर मिळत नाही.  द्राक्षापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे. द्राक्षापासून रस, सरबत, वाइन, जेली, लोणची, मुरंबा, बेदाणा व मणूका तयार करतात. आरोग्याच्या दृष्टीने द्राक्षाचे अनेक फायदे आहेत.  बेदाणा

  • बेदाणा ही वाळलेली द्राक्षे असतात. कोणत्याही प्रकाराची द्राक्षे वाळविल्यास त्या फळांना बेदाणा म्हणणे योग्य होणार नाही. 
  • बिया नसलेल्या, मऊ, स्वाद असलेल्या व साठवणीमध्ये एकमेकांना 
  • चिकटून न बसणाऱ्या अशा वाळविलेल्या द्राक्षांना बेदाणा ही संज्ञा लागू पडते. 
  • बेदाण्यात १७ टक्के पाणी, ६८-७१ टक्के कार्बोहायड्रेट, २·३ टक्के प्रथिने आणि ०·५ ते ३ टक्के स्निग्ध पदार्थ असतात.
  • साधारणपणे १०० ग्रॅम बेदाण्यामधून २८८ कॅलरी ऊर्जा मिळते.
  • औषधी गुणधर्म

  • काळ्या द्राक्षामध्ये जीवनसत्त्व सी, के आणि ए मुबलक प्रमाणात असतात. तसेच फ्लेवॉनॉईड आणि खनिजे भरपूर असतात. काळी द्राक्ष प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरतात.
  • द्राक्षामधील फ्रुक्टोड आणि ग्लुकोज रक्तामध्ये सहजपणे शोषले जाते. त्यामुळे थकवा दूर होऊन शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.
  • हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी द्राक्षाचे सेवन करावे.
  • द्राक्षांपासून तयार होणारी रेड वाइन रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करते. तसेच कोलेस्टॉलची पातळी कमी करते. परिणामी, हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • फ्री रेडिकल्समुळे शरीरातील पेशींचे नुकसान होते. त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका जास्त वाढतो. मात्र काळ्या द्राक्षामध्ये जीवनसत्त्व क, मॅग्नेशिअम, बीटा कॅरोटीनसारखे ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. यामुळे फ्री रेडीकल्समुळे शरीरातील होणारे नुकसान टाळले जाते. 
  • द्राक्षामध्ये ग्लुकोज, मॅग्नेशिअम आणि सायट्रिक आम्ल यांसारखे पोषकघटक असतात. टीबी, कॅन्सर आणि रक्ताचा संसर्गावर द्राक्ष गुणकारी असतात.
  • द्राक्षाच्या सेवनामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. काळी द्राक्षे खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून आराम मिळतो. 
  • लोहाचे प्रमाण द्राक्षामध्ये अधिक असते. शरीरात रक्त कमी असल्यास, १ ग्लास द्राक्ष रसामध्ये २ चमचे मध घालून प्यावे. त्यामुळे ॲनिमियापासून मुक्तता मिळण्यास मदत होते. तसेच थकवा कमी होऊन ताजेतवाने वाटते.
  • त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी द्राक्ष खाणे फायद्याचे ठरते.
  • - गणेश गायकवाड, ९८५०२३६३८० (अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com