निरंतर लोकसंवाद, महिला ग्रामसभा, प्रभावी कष्टकरी लोकसंघटनेच्या माध्यमातून औरंगाबाद येथील भारतीय लोक व पर्यावरण विकास संस्थेने (लोकपर्याय) वेगळी ओळख तयार केली आहे. लोकसहभागातून ग्रामविकास, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेती विकास आणि जैवविविधता संवर्धनासाठी संस्था विविध उपक्रम राबविते.
भारतीय लोक व पर्यावरण विकास संस्था (लोकपर्याय) ही नोंदणीकृत संस्था सन २००२ पासून महिला, आदिवासी, दलित, भटके-विमुक्त, शेतकरी-शेतमजुरांची न्याय्य हक्कांसाठी कार्यरत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, खुल्ताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, औरंगाबाद तालुके आणि नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. संस्था सामान्य कष्टकरी लोकसमूहांना शासनाच्या विविध कायदे- योजनांचा हक्क मिळवून देत आहे. संस्थेच्या उपक्रमात मंगल खिंवसरा, शांताराम पंदेरे सोडल्यास बाकी सारे स्थानिक स्त्री-पुरुष कार्यकर्ते त्याच लोकसमूहांतील तीन पिढ्यांपासून कार्यरत आहेत. एकनाथ बागूल, कांतिलाल मोरे, सुमनताई मोरे, रामदास, दोन्ही ज्ञानेश्वर, बाबूराव, हिराबाई, विठाबाई, धर्माभाऊ, रघुभाऊ, परसराम भाऊ, रवी गरुड, रवी मोरे, सयाजी,आदी आदिवासी, दलित, भटके-विमुक्त समूहांतील तरुण सहकारी कार्यरत आहेत. २०११ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार “औरंगाबाद व्हिजन-२०२०”मध्ये आदिवासी-भटके-विमुक्तांवरील विषय लिहिण्यासाठी लोकपर्यायने सहकार्य केले. संस्थेतील सदस्य नियतकालिकांमध्ये समूहांच्या प्रश्नांवर सातत्याने लिखाण करतात. संस्थेचा ‘वैजापूर पॅटर्न’ संस्थेच्या प्रयत्नांतून काही लोकसमूहांची मॉडेल्स उभी राहात आहेत. केवळ अति आदर्शवादात गुंतून न पडता वास्तवाचे पदोपदी भान ठेवत शासनाला ही लोकसमूहांची मॉडेल्स कशी स्वीकारायला लावायची हा संस्थेचा प्रयत्न असतो. उदा. जातीचे दाखले, शासन-प्रशासन-लोकप्रतिनिधी, पत्रकार, ग्रामपंचायत, लोकसमूह आणि संस्था यांचा परस्पर विश्वास, संवाद आणि सामूहिक कार्यपद्धतीनुसार योग्य कायद्यांची कालबद्धरीत्या अंमलबजावणी करता येते. हा नऊ तालुक्यांतील यशस्वी प्रयोग कोणत्याही विचारसरणीचे सरकार आले तरी हे अत्यावश्यकच आहे. संस्थेच्या प्रयत्नातून ‘वैजापूर पॅटर्न' पुढे आला आहे. महिला ग्रामसभा, आम ग्रामसभा, निरंतर लोकसंवाद, प्रभावी कष्टकरी लोक संघटन आणि कष्टकरी समूहांचे स्वत:चे नेतृत्व उभारण्यावर संस्थेचा भर आहे. लोकपर्याय संस्थेला महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार आणि अहिल्याबाई होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. संस्थेचे विविध उपक्रम
शैक्षणिक उपक्रमांना चालना
- शांताराम पंदेरे, ९४२१६६१८५७ (लेखक लोकपर्याय संस्थेत कार्यरत आहेत)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.