ज्ञानग्राम-शाश्‍वतग्राम निवडीचे निकष

ज्ञानग्रामासाठी निवड करण्याची मागणी गावाकडूनच आली पाहिजे.गावातील ग्रामपंचायत ही ज्ञान ग्राम चळवळ व नॉलेज-कॉलेज-व्हिलेज सहयोगी योजनेसाठी अनुकूल असावी. तसे हमीपत्र ग्रामपंचायतीने देणे अनिवार्य आहे.
Rural development
Rural development

ज्ञानग्रामासाठी निवड करण्याची मागणी गावाकडूनच आली पाहिजे.गावातील ग्रामपंचायत ही ज्ञान ग्राम चळवळ व नॉलेज-कॉलेज-व्हिलेज सहयोगी योजनेसाठी अनुकूल असावी. तसे हमीपत्र ग्रामपंचायतीने देणे अनिवार्य आहे.

ज्ञानग्राम ही प्रक्रिया स्वयंपूर्ण मागणीवर आधारित विकास प्रक्रिया असल्याने गावाची निवड करताना काही किमान निकष पूर्ण करणे आवश्‍यक आहे. ते निकष पुढीलप्रमाणे आहेत. 

  • ज्ञानग्रामासाठी निवड करण्याची मागणी गावाकडूनच आली पाहिजे. प्रत्येक गावात आपल्या गावाचा विकास व्हावा असा विचार असणारी माणसे असतात. त्या माणसांच्या मदतीने गावाची निवड करावी.  
  • गावाचा विकास व्हावा अशी तळमळ असणारे गावातील युवक, ज्येष्ठ व्यक्ती किंवा महिला यांच्या माध्यमातून (संपर्कातून) गावाची निवड करावी. 
  • निवडलेल्या गावांचे भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्या या संदर्भात शक्‍यतो पर्याप्त आकारमान असा निकष असावा. छोट्या आकाराची व मध्यम आकाराची गावे या चळवळीसाठी प्रथम निवडण्यात येतात. (लोकसंख्या १ ते ५००० व ग्रामपंचायत सदस्य संख्या ५ ते १५ असावी) ५०० ते १००० लोकसंख्या हे प्रमाण उत्तम.) 
  • गावात पक्षीय राजकारण व आपापसातील वादविवाद, भांडणाचे प्रमाण हे किमान पातळीवर असणारे गाव निवडल्यास यश लवकर येण्यास मदत होते. 
  •  गावातील एखादी तीव्र समस्या अथवा प्रश्‍न असल्यास ते गाव प्रथम निवडण्यास प्राधान्य द्यावे. 
  • महाविद्यालय परिसरातील गाव निवडण्यास प्राधान्य द्यावे. महाविद्यालयीन स्थानापासून चारही दिशांना १० ते १५ किमी परिघातील गावे निवडल्यास संनियंत्रण व मूल्यमापन करणे अधिक सोईचे व परिणामकारक ठरते. 
  • गावातील ग्रामपंचायत ही ज्ञान ग्राम चळवळ व नॉलेज- कॉलेज-व्हिलेज सहयोगी योजनेसाठी अनुकूल असावी. तसे हमीपत्र ग्रामपंचायतीने देणे अनिवार्य आहे. 
  • ज्ञानग्राम चळवळ, ज्ञानग्राम विकासाचे टप्पे 

  • गावातील विशिष्ट घटकाच्या (युवक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, प्रशासकीय अधिकारी इत्यादी) मागणीनुसार गावांची निवड. 
  • गावाच्या परिक्षेत्रातील महाविद्यालयांची निवड. 
  • गाव आणि महाविद्यालय यांची संयुक्त बैठक आयोजन. परस्परांच्या गरजा आणि त्यासाठी पुढे येऊन मदत करण्याबाबत सहभावना निर्मिती. 
  • गाव आणि महाविद्यालय (ग्रामपंचायत व महाविद्यालय) यामध्ये ' ज्ञानग्राम-शाश्‍वतग्राम' विकास योजना तसेच नॉलेज- कॉलेज- व्हिलेज योजना राबविण्याबाबत सामंजस्य करार. 
  •  महाविद्यालयाकडून सदर गाव पुढील किमान ३ व कमाल ५ वर्षासाठी दत्तक घेण्याबाबत करार. या कालावधीत गावाच्या ग्रामपंचायत आणि इतर घटकांनी महाविद्यालयास सहकार्य व विकास कामात सहभाग देण्याबाबत  मानसिकता तयार करणे आवश्यक. 
  •  ‘आमचं गाव-आमचा विकास' उपक्रमाअंतर्गत महाविद्यालय व पंचायतराज व्यवस्थेतील त्रिस्तरीय अधिकारी व लोकनियुक्त लोकप्रतिनिधी यांचे सहयोगाने गावाचा बेसलाईन सर्व्हे तथा पायाभूत सुविधा सर्वेक्षण करणे. 
  •  गावांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या दुप्पट संख्ये इतक्‍या सदस्यांची ‘ग्रामविकास युवा परिषद'  सर्व वार्डातील प्रतिनिधींना घेऊन स्थापन करणे. 
  •  गावात ग्रामसंसाधन गट , कृती गट आणि सामाजिक अंकेक्षण गट या वैधानिक गटांची स्थापना करणे. 
  • गावाचे संपुर्ण (SWOT) विश्‍लेषण करणे, संसाधन सर्वेक्षण, समस्या सर्वेक्षण व ग्रामविकास योजना आराखडा तयार करणे. 
  • ‘आमचं गाव- आमचा विकास' व गावाच्या विकासाच्या इतर योजना यांचा समन्वय घालून. ग्रामविकास आराखड्याची अंमलबजावणी करणे. 
  • ज्ञानग्राम चळवळ वाढीसाठी धोरणात्मक बाबी 

  • गावाच्या शाश्‍वत विकासासाठी गावातील युवकांचे निःस्वार्थ, प्रामाणिकपणा व नीतिमत्ता या मूल्यांवर संघटन आणि टिकवण्यासाठी प्रयत्न आवश्यक. 
  • गावांमध्ये पक्षीय राजकारण व इतर प्रकारचे भेदाभेद व वादविवाद असले तरी ग्रामविकासाच्या कामामध्ये सहभावनेतून काम करण्याची भावना असणे आवश्‍यक. 
  • गावामध्ये बिनविरोध ग्रामपंचायत व सरपंच निवडीची प्रक्रिया झाल्यास त्यातून निर्माण होणारा एकोपा व सामाजिक सौहार्द हे विकासास पोषक वातावरण निर्माण करणे. 
  • ग्रामपंचायत कारभारामध्ये पारदर्शकता ठेवणे हे गावाचा विश्‍वास संपादनाच्यादृष्टीने महत्त्वाचे कार्य असल्याने त्यासाठी सर्वांनी आग्रही असले पाहिजे. 
  •  ग्रामस्थांनी आपले हक्क व गावाच्या विकास योजना याबाबत जागृत राहून त्याबाबत सहकार्याची भावना ठेवून त्याप्रमाणे कृती करणे आवश्‍यक. 
  • विकास कामांची गुणवत्ता वाढावी आणि ती टिकावी म्हणून सोशल ऑडिट करण्याची प्रथा सुरु करून ती टिकवावी. 
  • प्रत्येकाने आपणास नेमून दिलेले काम करताना इतरांच्या कामात व विकास कामात अडथळे न आणणे. 
  • वरील धोरणात्मक बाबी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व युवायुवती यांनी पाळल्यास ज्ञानग्राम हे शाश्‍वत ग्राम होण्यास निश्‍चित खूप मदत होईल व ज्ञानग्राम चळवळ पुढे जाईल. 

      -  डॉ. कैलास बवले, ८८८८८९२७५७ (समन्वयक, डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्‍वत ग्रामविकास केंद्र, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com