महिला सक्षमीकरणातून होतो ग्राम विकास

सामर्थ्य संपन्न ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी कोकणातील ग्रामीण भागात गेली सुमारे चार दशके लोकसाधनेचे कार्य चालू आहे. सक्षम समाजाच्या उभारणीसाठी मूलभूत घटक असणाऱ्या कुटुंबाला सक्षम करणे गरजेचे आहे. कुटुंबाचे सक्षमीकरण हे कुटुंबातील स्त्रीच्या सक्षमीकरणाशिवाय अशक्य आहे. हे ओळखून संस्थेने महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करायचे ठरवले.
Accelerate animal husbandry from women's groups
Accelerate animal husbandry from women's groups

सामर्थ्य संपन्न ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी कोकणातील ग्रामीण भागात गेली सुमारे चार दशके लोकसाधनेचे कार्य चालू आहे. सक्षम समाजाच्या उभारणीसाठी मूलभूत घटक असणाऱ्या कुटुंबाला सक्षम करणे गरजेचे आहे. कुटुंबाचे सक्षमीकरण हे कुटुंबातील स्त्रीच्या सक्षमीकरणाशिवाय अशक्य आहे. हे ओळखून संस्थेने महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करायचे ठरवले. संस्थेची शाळा स्थापन झाल्यापासून पहिली चार वर्षे शाळेतील वर्गामध्ये एकही मुलगी नव्हती. आता मात्र विद्यार्थी संख्येच्या निम्म्याहून जास्त मुली आहेत. सामर्थ्य संपन्न ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी कोकणातील ग्रामीण भागात गेली सुमारे चार दशके लोकसाधनेचे कार्य चालू आहे. सक्षम समाजाच्या उभारणीसाठी मूलभूत घटक असणाऱ्या कुटुंबाला सक्षम करणे गरजेचे आहे. कुटुंबाचे सक्षमीकरण हे कुटुंबातील स्त्रीच्या सक्षमीकरणाशिवाय अशक्य आहे. हे ओळखून संस्थेने महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करायचे ठरवले. संस्थेची शाळा स्थापन झाल्यापासून पहिली चार वर्षे शाळेतील वर्गामध्ये एकही मुलगी नव्हती. आता मात्र विद्यार्थी संख्येच्या निम्म्याहून जास्त मुली आहेत. अर्थात, हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. लोकांचा विश्‍वास संपादन करून, विविध युक्त्या लढवून कुटुंबातील या शक्ती स्थानांना, स्त्रियांना साद घालण्यात लोकसाधनेला यश मिळत गेले. त्यामुळे मुली शिकून सबला झाल्या, त्यांनी संस्थेलाही बळ दिले. यातील काही ग्रामीण भागातील उदाहरणे आपल्या समोर ठेवत आहे.  कुंदा बैकर  आई, वडिलांना जड झालेल्या कुंदा बैकर या अपंग मुलीला घेऊन तिच्यासाठी संस्थेने सावित्री कन्या छात्रालय सुरू केले. पुढे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने शिवण कला आणि फॅशन डिझायनिंग डिप्लोमा पूर्ण केला. परिसरातील इतर स्त्रियांनाही त्या प्रशिक्षणाचा लाभ मिळण्याकरिता तिने संस्थेकडे आग्रह धरला आणि त्यातून सुरू झाला “निर्मिती शिवणकला वर्ग”. या वर्गाची पूर्ण जबाबदारी घेऊन १५० पेक्षा जास्त मुलींना तिने शिवणकलेचे शिक्षण दिले. शरीराने अपंग असली, तरी कुंदा स्वतःच्या पायांवर उभी राहिली. ज्या एका मुलीला घेऊन सावित्री कन्या छात्रालय सुरू झाले, पुढे दहा वर्षे त्याची अधीक्षिका म्हणून कुंदाने जबाबदारी सांभाळली. आता लीलावती इन्फोसिस फाउंडेशनच्या मदतीने १०० मुलींचे वसतिगृह सुरू आहे. कुंदाचा अपंग मुलाबरोबरच विवाह होऊन त्यांना दोन मुली आहेत. या अपंग कुटुंबाने पोल्ट्री, काजू फॅक्टरी, शेळीपालन असे उद्योगही सुरू केले. शरीर अपंग असले तरी सक्षमीकरणाने त्यांची मने पंगू राहिली नाहीत. संजना मोहिते  इंग्रजी भाषेच्या भीतीपोटी शाळेत जाण्यास नकार देणाऱ्या या मुलीने पुढे इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. आता मुंबईत इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी इंग्रजी आणि ग्रामरचे विशेष कोचिंग क्लासेस ती घेते. कुंदा येसवारे   संस्थेच्या शाळेत पाऊल टाकणारी कुंदा येसवारे पहिली विद्यार्थिनी. चुणचुणीत आणि धीट व्यक्तिमत्त्वाच्या कुंदाकडून सावित्रीबाई फुले यांच्यावर लिहिलेल्या एकपात्री प्रयोगाची तयारी करून घेण्यात आली. पुढे समाजात प्रयोग करता करता कुंदाने सावित्रीबाईंचे पूर्ण रूप साकारले. मुलींच्या शिक्षणाचा प्रसार करण्यास संस्थेला महत्त्वाचे योगदान दिले. शेती, पूरक उद्योगाला चालना  लोकसाधनेने भात उत्पादन वाढीसाठी महिलांसाठी भात लागवडीची सुधारित पद्धतीची प्रात्यक्षिके घेतली. गावागावांत तंत्रज्ञानाचा प्रसार केला. संस्थेने कुटुंबासाठी उपयुक्त अशी पाच झाडे निवडून २२ खेड्यांतील प्रत्येक कुटुंबास दान केली. नारळ, लिंबू, केळी, गवती चहा, कोरफड यांची वनौषधी वाटिका सांडपाण्यावर तयार केली. यामुळे शेतीबरोबरच वनौषधींची औषधी व आर्थिक उपयुक्तता अधोरेखित झाली. संस्थेने महिलांसाठी फार्म मॅनेजमेंट, अन्न प्रक्रिया प्रशिक्षण, बचत गट इत्यादी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले. संस्थेने परिसरातील खेड्यातील स्त्रियांकरिता एक दिवसापासून एक वर्षापर्यंतच्या कालावधीचे विविध व्यवसाय प्रशिक्षण चालविले. यामुळे स्त्रियांना शेती आणि अन्य उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षण आणि दिशादर्शन मिळून आर्थिक सबलीकरणाची बीजे रोवली गेली. आरोग्यविषयक उपक्रम  संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य सेवेतून स्त्री सक्षमीकरण करण्यासाठी काही विशेष उपक्रम आम्ही हाती घेतले. त्यासाठी ३२ खेड्यांमधील प्रत्येकी दोन महिलांना ग्रामआरोग्य सेविका म्हणून प्रशिक्षित केले. कुटुंबातील स्वतःचे अस्तित्व विसरलेल्या या महिलांना यामुळे एक वेगळी ओळख मिळाली. या ३२ गावांतून या महिलांनी “गावचा दवाखाना” सुरू केला. एवढेच नव्हे तर त्यांच्या मधला आत्मविश्‍वास जागा झाला. या आरोग्य सेविकांपैकी सौ. राजश्री मोहिते, सौ. शीतल दवंडे, सौ. माधुरी गमरे या स्वबळावर निवडणूक लढवून ग्रामपंचायत सरपंच झाल्या. पुढे काही अंगणवाडी सेविका झाल्या. काही आशा दीदी झाल्या. या आरोग्य सेविका संबंधित गावातील महिलांच्या विश्‍वासाचे, आधाराचे ठिकाण झाल्या आहेत. रक्तदान आणि कुटुंब नियोजनासारखे उपक्रम या सक्षम आरोग्य सेविकांमुळे शक्य झाले आहेत. - डॉ. राजा दांडेकर  ९४२२४३१२७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com