लोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी येथे पाणीपुरवठा योजनेच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरींचे काम सुरू करण्यात आले आहे. डिसेंबर, २०१७ मधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट जनतेने निवडून दिल्यामुळे मी लोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी) गावचा सरपंच झालो. ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वास सार्थ ठरविण्यासाठी लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचे नियोजन केले. यापूर्वी नळपाणीपुरवठा योजनेअंतर्गत नळजोडणी तसेच हातपंपाद्वारे कुटुंबांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जाते असे. परंतु पाणी गुणवत्ता तपासणीनंतर ग्रामस्थांच्या निरोगी आरोग्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाळ्यामध्ये पाणी शुद्धीकरण संयंत्र बसविले. त्याद्वारे प्रत्येक कुटुंबास पाच रुपयांमध्ये वीस लिटर शुद्ध पाणी दिले जाते. लोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी येथे पाणीपुरवठा योजनेच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरींचे काम सुरू करण्यात आले आहे. गावशिवारातील ओढ्यावर दोन बंधारे बांधण्यात आले आहेत. शेतरस्त्याचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी वर्गणी जमा केली. त्याद्वारे जवळपास अर्धा किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला आहे. शेती विकासासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. ग्राम विकासाचे उपक्रम
ग्राम स्वच्छतेवर भर
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.