वासरांचे गुडघे का सुजतात?

वासरू जन्माला आल्यानंतर पहिले २४ तास त्याच्या पुढील सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाचे असतात.वासरू बाहेर आल्यानंतर त्याच्या नाळेच योग्य व्यवस्थापन करणे गरजेचं असत.
What is treatment for swelling of foot of calf?
What is treatment for swelling of foot of calf?

वासरू जन्माला आल्यानंतर पहिले २४ तास त्याच्या पुढील सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाचे असतात. वासराची वाढ गर्भात होत असताना वासराला लागणारी सर्व पोषणमुल्ये नाळेमार्फत आईकडून वासराला पुरविली जातात. वासरू बाहेर आल्यानंतर त्याच्या नाळेच योग्य व्यवस्थापन करणे गरजेचं असत.

नाळेचा डायरेक्ट  संबंध वासराच्या रक्ताभिसरणाशी येत असल्याने नाळेच योग्य व्यवस्थापन न केल्यास त्यातून झालेला संसर्ग शरीरातील कुठल्याही भागात लक्षणे निर्माण करू शकतो. यात प्रामुख्याने बेंबीला गुडघ्याना  सुज येते, हगवण लागते, काही वेळा या जीवाणूंचा संसर्ग संपूर्ण शरीरात झालेला दिसून येतो.

हेही पाहा - वासरांचे संगोपन कसे करावे?

वासरांमध्ये बेंबीला सूज म्हणजेच नाभीदाह आजाराचा तत्काळ उपचार न केल्यास जंतूंचा संसर्ग वाढत जाऊन नाभिमधून शरीरात विविध ठिकाणी होऊ शकतो. बऱ्याच वेळा या जंतूंचा संसर्ग सांध्यामध्ये दिसून येतो. त्यातही प्रामुख्याने पुढच्या व काही वेळेस मागच्या पायाच्या सांध्यांना सूज येणे, हात लावल्यास गरम लागणे, वेदना होणे अशी लक्षणे दिसून येतात. यात एक किंवा चारही गुडघ्याना सुज येऊ  शकते. वेळीच उपचार न केल्यास गुडघ्यात पू होऊन त्याची जखम होऊ शकते. अशी झालेली जखम लवकर भरून येत नाही कारण कालवड उठताना व बसताना पुढील गुडघे टेकवत असते.

प्रतिजैविके व इतर आवश्यक उपचार ३ ते ५ दिवस तज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्याने करावेत. गुडघे सुजली असल्यास प्रतिजैविकांच्या  वापरानंतर सूज जाते किंवा सूज मऊ होऊन त्यात पू तयार होतो. बेंबीत आणि गुढग्यात पू तयार झाला असल्यास पशुवैद्यकांकडून त्याचा निचरा करून घ्यावा. गुढगा सुजला असल्यास तिला मातीवर किंवा मऊ जागेवर बांधावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com